भारतीय कामगार चळवळीचे आद्य जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांची जयंती १३ ऑगस्ट १८४८*

ठाण्यात परत आल्यावर मेघाजी व गंगाबाईंचा राजाराणीचा संसार आनंदात सुरु झाला होता. दोघे नवरा-बायको तलावापाळीवरच्या शेतीत कष्ट करू लागले होते. आपल्या शेतात भाजीपाला पिकवू लागले होते व मेघाजी लोखंडे दुकानात बसून भाजीपाला स्वतः विकू लागले होते. माळ्याच्या या मजूरहीन शेतीमुळे चांगला नफा राहू लागला होता. मेघाजींच्या कष्ट व प्रामाणिकपणाला आता फळ येऊ लागले होते. मेघाजींच्यामुळे आपणही पोटापाण्याला लागलो, ठाण्यात आलोत, घर व शेती कसायला मिळाली, म्हणून मेघाजी लोखंडेंचा मित्र परिवारही आता त्यांचा आदराने उल्लेख करू लागला होता.

अशा समाधानाच्या व आनंदाच्या काळात मेघाजी व गंगाबाईंच्या संसारवेलीवर सुंदर फुले उमलू लागली होती. १३ ऑगष्ट १८४८ रोजी त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. हे कष्टाचे फळ व यमाईचा प्रसाद म्हणून मेघाजी व गंगाबाईंनी मोठ्या आवडीने व श्रद्धेने त्या नवजात बालकाचे नांव नारायण ठेवले होते. दीन-दुबळ्यांचा उद्धारकर्ता तो नारायण ! ज्याने आपल्या आयुष्यात भविष्यात आपले नाव सार्थक केले होते. नारायणच्या पाठीवर १८५० मध्ये नारायणला भाऊ झाला होता. नारायणचा भाऊ म्हणून मोठ्या आवडीने गंगाबाईंनी त्याचे नांव भाऊराव ठेवले होते. भाऊरावांचे नातू आता वयोवृद्ध असून सध्या ते पनवेलला रहात आहेत.
त्यांनीच स्वतः प्रस्तुत लेखकाला सांगितलेल्या वृतांतानुसार या दोन भावांच्या जन्माची कहाणी प्रस्तुत लेखकाला अवगत झाली होती. मेघाजीराव लोखंडे व गंगाबाईंच्या संसाराच्या बागेत ही दोन फुले आनंदाने डोलू लागून कणाकणाने मोठी होत होती. पारिव्राजक बनून आलेल्या मेघाजींच्या जीवनात आनंद व समाधानाचे दिवस येऊ लागले होते.
भारतीय कामगार चळवळीचे आद्य जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे
दिल बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ट्रॅक्टर 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा



