✨✨ लिंगे उद्योग समूहाची गोडधोड सुरू… नव्या यशाच्या पर्वाला प्रारंभ! ✨✨

✨✨ लिंगे उद्योग समूहाची गोडधोड सुरू… नव्या यशाच्या पर्वाला प्रारंभ! ✨✨
🌟🌟 वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर सहाव्या शेडची भव्य पायाभरणी 🌟🌟
वसंत पंचमीच्या पवित्र मुहूर्तावर लिंगे उद्योग समूहाच्या सहाव्या शेडचे पायाभरणी व भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. हा सोहळा लिंगे उद्योग समूहाचे संस्थापक सत्यशोधक शंकरराव लिंगे सौ सुनंदा शंकर लिंगे सौ सायली जयदीप लिंगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी सौ. सुनंदा शंकर लिंगे, सर्वश्री जयदीप लिंगे, तसेच संस्थेचे संचालक जय सिंहशंकर लिंगे व जयदीप शंकरराव शिंदे उपस्थित होते.
सुमारे १७ वर्षांपूर्वी MIDC चिंचोली येथील A-19 / I ब्लॉकमधील प्लॉट व २००८ साली चार एकर जागा पी.व्ही.सी पाईप . जलधारा ऍग्रोप्लास्ट युनिट ग्रुप, बार्शी येथील सोमाणी यांच्याकडून हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर या जागेत प्रथम १५,००० स्क्वेअर फूटचे शेड, पुढे ५५,००० स्क्वेअर फूटचे नवीन शेड उभारण्यात आले. आता शेजारील उर्वरित २ एकर जागा एकत्र करून ४०,००० स्क्वेअर फूटच्या भव्य नवीन शेडच्या बांधकामासाठी पायाभरणी करण्यात आली आहे.
या कारखान्यात प्लास्टिक स्क्रॅपचे वॉशिंग, ग्राइंडिंग, ड्रॉइंग करून त्यापासून उच्च दर्जाचे प्लास्टिक दाणे तयार केले जातात. याच रॉ मटेरियलपासून आधुनिक इज्राईल टेक्निकच्या मशीनद्वारे ऑनलाईन फ्लॅट, राऊंड ड्रिप पाईप, स्प्रिंकलर पाईप व मल्चिंग पेपर तयार केले जातात. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जाडी, लांबी, रुंदी व अंतर ऑनलाईन ऑर्डरप्रमाणे तयार करून दिले जातात.
उत्पादनावर वाढलेल्या विश्वासामुळे येथे तयार होणारा संपूर्ण माल दररोज पूर्णतः विक्रीस जातो. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर या उत्पादनांची मागणी आहे.
विस्तारित प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या या नव्या शेडमध्ये सध्या असलेल्या इज्राईल टेक्निकच्या १० मशीनसोबत आणखी ५ नवीन मशीन बसवण्याचे नियोजन आहे. सुमारे एक वर्षात हे शेड पूर्ण होऊन नव्या फॅक्टरीचे उत्पादन सुरू होणार आहे.
१९ फेब्रुवारी १९७४ रोजी एका छोट्या स्क्रॅपच्या दुकानातून सुरू झालेला हा प्रवास आज भव्य यशोगाथेत रूपांतरित झाला आहे. तब्बल ५२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव लाभलेल्या सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या नेतृत्वाखाली लिंगे उद्योग समूह दिनदुपटीने व रात्री चौपट प्रगती करत आहे, आणि याचा थेट लाभ दक्षिण भारतातील हजारो शेतकऱ्यांना होत आहे.
📢 तीन बंधू न्यूज सेवक क्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 ७३८७७३७८०१
👉 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
👍 बातमी लाईक करा | 🔁 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा
💬 कमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा, विसरू नका!
—
🔖 सोशल मीडिया हॅशटॅग
#LingeIndustryGroup #नव्या_यशाची_सुरुवात #भूमिपूजनसोहळा
#IndustrialGrowth #MakeInIndia #FarmerFriendly
#DripIrrigation #IsraeliTechnology #शेतकरी_विकास




