बुलढाणा जिल्हा कर्मचारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भानुदास हुडेकर यांची निवड; कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याला मिळाला सन्मान

बुलढाणा जिल्हा कर्मचारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भानुदास हुडेकर यांची निवड; कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याला मिळाला सन्मान
बुलढाणा : अखिल भारतीय माळी महासंघाचे बुलढाणा तालुक्याचे माजी उपाध्यक्ष, संत सावता सेवा भावी ट्रस्ट, नांद्रा कोळीचे अध्यक्ष तसेच समाजाभिमुख व तळमळीचे कार्यकर्ते भानुदास पुंजाजी हुडेकर यांची बुलढाणा जिल्हा कर्मचारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
एसटी कर्मचारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी कर्मचारी संघटन मजबूत करण्यासाठी, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, गरजू कर्मचाऱ्यांना वेळेवर मदत करण्यासाठी आणि सेवाभावी वृत्तीने सातत्याने काम केले आहे. त्यांच्या प्रामाणिक, अभ्यासू आणि समन्वयात्मक कार्यपद्धतीमुळे कर्मचारी वर्गात त्यांच्याविषयी विशेष आदराची भावना निर्माण झाली आहे.
समाजकार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये ते नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असून त्यांच्या निवडीमुळे कर्मचारी व समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मान्यवर, सहकारी आणि हितचिंतक त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.
संपर्क :
भानुदास पुंजाजी हुडेकर
मु.पो. नांद्रा कोळी, ता. जि. बुलढाणा – ४४३००१
मो. ९४२०९७२९२२
निवडीच्या स्वागतानंतर अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकराव लिंगे राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश भाऊ हिराळकर राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठल आबा तोडकर प्रदेश अध्यक्ष गौतम क्षीरसागर यांनी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
संपादकीय संदेश
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती यांची नेहमीच दखल घेतली जाते. भानुदास हुडेकर यांची निवड ही त्यांच्या दीर्घकालीन कार्याची पावती असून, या पदाच्या माध्यमातून ते कर्मचारी हित आणि समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या भावी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा!
📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये हा नंबर जोडा : 7387377801
👍 बातमी लाईक करा
📤 शेअर करा
▶️ सबस्क्राईब करा
📲 फॉरवर्ड करा
💬 कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनेल फॉलो करायला विसरू नका!





