सोलापूर

🚨 १७५ वर्षांनंतरही इतिहासाशी छेडछाड? जागरूक समाजामुळे बालभारतीला अखेर दुरुस्ती करावीच लागली!

🚨 १७५ वर्षांनंतरही इतिहासाशी छेडछाड? जागरूक समाजामुळे बालभारतीला अखेर दुरुस्ती करावीच लागली!

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेबाबत करण्यात आलेली गंभीर व दिशाभूल करणारी नोंद अखेर दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब आणि सत्यशोधक विचारांच्या अभ्यासकांनी ही गंभीर चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर बालभारतीच्या संचालकांनी शुद्धीपत्रक काढून आवश्यक दुरुस्ती करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, हे वर्ष क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी निमित्त “महात्मा फुले गौरव वर्ष” म्हणून देशभर साजरे केले जात आहे. देशभर विविध कार्यक्रमांद्वारे महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव होत असताना, १७५ वर्षांपूर्वी १ जानेवारी १८४८ रोजी सुरू झालेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या इतिहासाबाबतच पाठ्यपुस्तकात चुकीची नोंद होणे ही अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी बाब आहे.

याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भिडे वाड्यातील याच ऐतिहासिक पहिल्या मुलींच्या शाळेचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम सुरू असून ते लवकरच जनतेला समर्पित करण्यात येणार आहे. अशा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद काळात शालेय पुस्तकांमध्ये चुकीचा इतिहास छापला जाणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.

बालमनावर जे इतिहास म्हणून बिंबवले जाते तेच पुढील पिढी सत्य मानते. त्यामुळे बालभारती, संबंधित लेखक, तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी प्रत्येक ऐतिहासिक नोंद अत्यंत जबाबदारीने, पुराव्यांच्या आधारे आणि अचूकतेने मांडली पाहिजे.

सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “ही दुरुस्ती म्हणजे जागरूक महात्मा फुलेप्रेमी, सत्यशोधक कार्यकर्ते आणि इतिहास अभ्यासकांचा विजय आहे. मात्र यापुढे कोणत्याही महापुरुषांच्या इतिहासाबाबत अशा चुका पुन्हा होणार नाहीत, यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक दक्ष राहिले पाहिजे.”

✍️ संपादकीय संदेश

महापुरुषांचा इतिहास हा कोणाच्याही सोयीने बदलण्याचा विषय नाही.
इतिहास हा पुराव्यांवर उभा असतो आणि पुढील पिढीपर्यंत तो तितक्याच प्रामाणिकपणे पोहोचवणे ही प्रत्येक शैक्षणिक संस्थेची नैतिक जबाबदारी आहे. महात्मा फुले गौरव वर्षात आणि भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक जनतेसाठी खुला होण्याच्या उंबरठ्यावर अशा चुका होणे अत्यंत गंभीर आहे. समाज जागा आहे आणि सत्य लपविण्याचा प्रत्येक प्रयत्न उघडकीस आणत राहील.

📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📲 7387377801 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.

👉 बातमी लाईक करा • शेअर करा • सबस्क्राईब करा • फॉरवर्ड करा • कमेंट करा • बेल आयकॉन दाबा.

📢 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनेल फॉलो करायला विसरू नका!

#महात्माफुले #सावित्रीबाईफुले #महात्माफुलेगौरववर्ष #भिडेवाडा #पहिलीमुलींचीशाळा #इतिहासवाचवा #बालभारती #सत्यशोधक #दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button