जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे; गावोगावी ठराव करा, मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठवा!” — अखिल भारतीय माळी महासंघाचा बुलडाण्यातून एल्गार

- “जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे; गावोगावी ठराव करा, मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठवा!” — अखिल भारतीय माळी महासंघाचा बुलडाण्यातून एल्गार

बुलडाणा, दि. २१ जून २०२६ : महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती गौरव वर्षानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने राज्यव्यापी ओबीसी जनजागृती दौरा बुलडाणा जिल्ह्यात उत्साहात पार पडला. साखळी बु. व नांद्राकोळी येथे झालेल्या बैठकींमध्ये ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या, जातनिहाय जनगणना, आरक्षण संरक्षण, शिक्षण, रोजगार, शेतकरी प्रश्न आणि सामाजिक न्याय याबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा विश्वस्त रमेशभाऊ हिराळकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “जातनिहाय जनगणना हा केवळ आकड्यांचा विषय नसून सामाजिक न्याय, समान प्रतिनिधित्व आणि घटनात्मक अधिकारांचा प्रश्न आहे. प्रत्येक गावाने जातनिहाय जनगणनेच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करून तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवावे.”
साखळी बु. येथील कार्यक्रमात सौ. विजया अनिल कोळसे (माजी सरपंच), विजय राजाभाऊ खरात (जिल्हाध्यक्ष, बुलडाणा), अनिलभाऊ कोळसे (सामाजिक नेते), अभय तायडे (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य), रामभाऊ किसन अवचार (किसान आघाडी अध्यक्ष, चिखली तालुका), गजानन बांडे (जिल्हा कार्यकारिणी सदस्य) यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
नांद्राकोळी येथे झालेल्या कार्यक्रमात दलित मित्र माधवरावजी हुडेकर यांना भारतीय संविधान भेट देऊन सामाजिक समता आणि घटनात्मक मूल्यांचा संदेश देण्यात आला. यावेळी मनोज सुभाष जाधव (उपसरपंच, नांद्राकोळी), भानुदास हुडेकर (महात्मा फुले मंडळ) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या जनजागृती दौऱ्यात उपस्थितांना दोन महत्त्वपूर्ण पत्रकांची माहिती देण्यात आली. पहिल्या पत्रकातून जातनिहाय जनगणनेचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय फायदे समजावून सांगण्यात आले, तर दुसऱ्या निवेदन पत्रकाद्वारे ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
रमेशभाऊ हिराळकर, विजय खरात, अभय तायडे, रामभाऊ अवचार, गजानन बांडे, अनिलभाऊ कोळसे, मनोज जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन ओबीसी समाजाला संघटित होण्याचे, जातनिहाय जनगणनेच्या बाजूने ठराव मंजूर करण्याचे आणि शासनाला निवेदने पाठविण्याचे जोरदार आवाहन केले.
कार्यक्रमात उपस्थित समाजबांधवांनी “जागो ओबीसी, जागो ओबीसी, जागो ओबीसी!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला
📢 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सहभागी व्हा
📱 7387377801
👍 बातमी लाईक करा
🔁 शेअर करा
📩 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📺 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
📢 WhatsApp Channel Follow करायला विसरू नका!
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे




