🔥 “आधी जातनिहाय जनगणना, मग मतदान!” — ओबीसी समाजाचा बुलढाण्यातून एल्गार; विरोधकांना मतदान न करण्याचा ऐतिहासिक संकल्प 🔥

🔥 “आधी जातनिहाय जनगणना, मग मतदान!” — ओबीसी समाजाचा बुलढाण्यातून एल्गार; विरोधकांना मतदान न करण्याचा ऐतिहासिक संकल्प 🔥
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती गौरव वर्षानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने महाराष्ट्रव्यापी ओबीसी जनजागृती दौऱ्याअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील हातेडी बु., रायपूर, पांगरी उबरहंडे तसेच बुलढाणा शहर येथे व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. जातनिहाय जनगणना ही सामाजिक न्याय, समान प्रतिनिधित्व आणि घटनात्मक हक्कांसाठी अत्यावश्यक असल्याचा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा विश्वस्त रमेशभाऊ हिरळकार,जिल्हाध्यक्ष विजय राजाभाऊ खरात, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अभय तायडे, किसान आघाडीचे चिखली तालुकाध्यक्ष रामभाऊ किसन अवचार, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन बांडे यांनी गावोगावी जाऊन पत्रके वाटप करून जनतेला जातनिहाय जनगणनेचे महत्त्व पटवून दिले.
हातेडी बु. येथे भागवत गोविंद खांडेभराड व गणेश भगवान जाधव, रायपूर येथे कैलास प्रल्हाद अहिर, विशाल विलास अहिर, संदीपराव शालीकराम अहिर, तर पांगरी उबरहंडे येथे उद्धवराव जयराम पवार, रघुनाथ जयराम पवार, विष्णू तुळशीराम पवार, प्रविण मधुकर पवार, शैलेश रमेश पवार, अभिषेक सुभाष पवार, महेश हरिश्चंद्र पवार व वैभव पवार यांनी जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दौऱ्यादरम्यान बुलढाणा येथील महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाशजी वानेरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन व आवाहनपत्र देण्यात आले. ग्रामपंचायतींनी जातनिहाय जनगणनेच्या समर्थनाचे ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले.
जातनिहाय जनगणना का आवश्यक?
✅ लोकसंख्येचे खरे सामाजिक वास्तव समोर येईल.
✅ ओबीसी, भटके-विमुक्त व वंचित समाजाची अचूक संख्या स्पष्ट होईल.
✅ शिक्षण, नोकरी व प्रतिनिधित्वातील विषमता उघड होईल.
✅ आरक्षण, विकासनिधी व कल्याणकारी योजनांचे न्याय्य वाटप शक्य होईल.
✅ महिला, बालक व वृद्धांसाठी अचूक नियोजन करता येईल.
✅ आर्थिक व सामाजिक मागासलेपणाचे वास्तव समोर येईल.
✅ लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्वाची मागणी अधिक भक्कम बनेल.
✅ सामाजिक न्यायाच्या लढ्याला वस्तुनिष्ठ आधार मिळेल.
संपादकीय संदेश
जातनिहाय जनगणना हा केवळ आकड्यांचा विषय नाही; तो सामाजिक न्याय, समान हक्क, समान प्रतिनिधित्व आणि घटनात्मक अधिकारांचा प्रश्न आहे. देशातील बहुजन, ओबीसी, भटके-विमुक्त आणि सर्व वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी ही लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. त्यामुळे समाजाने संघटित होऊन जनजागृती वाढविणे ही काळाची गरज आहे.
जागो ओबीसी! जागो ओबीसी!! जागो ओबीसी!!!
📱 आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा : 7387377801
👉 बातमी लाईक करा
👉 शेअर करा
👉 सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड करा
👉 कमेंट करा
👉 बेल आयकॉन दाबायला विसरू नका
✍️ दिन बंधू निवास शिवक्रांती टीव्ही संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
🌹 दिनबंधू न्यूज 🌹









