योगदिनी जन्मलेला संघर्षाचा महामानव! ६8 व्या वाढदिवसानिमित्त डॉ. बी. के. यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

योगदिनी जन्मलेला संघर्षाचा महामानव! ६8 व्या वाढदिवसानिमित्त डॉ. बी. के. यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
फलटण परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय आणि सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे लोकमान्य उद्योग समूहाचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक व वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डॉ. बी. के. यादव यांच्या ६8व्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिनीच त्यांचा जन्म झाल्याने यंदाचा वाढदिवस अधिकच वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
लोकमान्य मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. संपतराव वाघमारे, ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जे. टी. पोळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, माजी नगरसेवक मिलिंद आप्पा नेवसे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, माजी सरपंच शरद कोल्हे, डॉ. सुरेखा यादव, डॉ. चंद्रशेखर यादव, डॉ. इंद्रजित यादव, डॉ. पूर्वा यादव, माजी पोलिस अधिकारी मारुतराव मोरे, जी. एम. जाधव, साहित्यिक तानाजी जगताप, अमोल जगताप, घनवट साहेब, डॉ. अमित मोरे, सौ. शेख मॅडम, सौ. कांबळे मॅडम, पत्रकार सागर चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत छोट्या शेतकरी कुटुंबात मातोश्री तानूबाई खंडेराव यादव यांच्या पोटी जन्मलेल्या डॉ. बी. के. यादव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि स्वतःच्या यशाचा मार्ग समाजसेवेशी जोडला. त्यांनी लोकमान्य इंग्लिश स्कूल, लोकमान्य वार्तापत्र, लोकमान्य उद्योग समूह, लोकमान्य पतसंस्था, लोकमान्य फाउंडेशन, लोकमान्य साखर कारखाना, लोकमान्य गॅस एजन्सी तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी मातोश्रींच्या नावाने महिला पतसंस्थेची स्थापना करून हजारो कुटुंबांना आधार दिला.
शिक्षण, आरोग्य, सहकार आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत कार्य करताना त्यांनी गरीब, शेतकरी, विद्यार्थी आणि वंचित घटकांना मदतीचा हात दिला. स्वतः डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबालाच उच्च शिक्षणाचा आदर्श दिला. जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपला आणि ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने जनजागृती केली.
अखिल भारतीय माळी महासंघ तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक न्यायाची चळवळ मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. राजकारणातही त्यांनी सहभाग घेत नगरपालिकेपासून लोकसभेपर्यंत निवडणुका लढवत लोकसेवेचा मार्ग निवडला.
आज ६५ वर्षांच्या प्रवासात त्यांनी केवळ संस्था उभारल्या नाहीत, तर हजारो माणसांची मने जिंकली. संघर्षातून उभे राहून समाजासाठी झटणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांमुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
✍️ संपादकीय संदेश
डॉ. बी. के. यादव हे केवळ एक यशस्वी डॉक्टर नाहीत, तर संघर्ष, जिद्द, शिक्षण, समाजसेवा आणि माणुसकी यांचे जिवंत विद्यापीठ आहेत. एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज हजारो कुटुंबांच्या आशेचा किरण बनला आहे. समाजासाठी जगणाऱ्या आणि आयुष्यभर जनसेवेची वाट न सोडणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या कार्याला सलाम आणि पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
🌹 हार्दिक शुभेच्छुक 🌹
सत्यशोधक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी मह
📱 ७३८७७३७८०१ हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा
🔄 शेअर करा
📢 फॉरवर्ड करा
💬 कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📲 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनेल लिंकवर टच करून Follow करा
#Hashtags
#DrBKYadav #HappyBirthdayDrBKYadav #LokmanyaGroup #InternationalYogaDay #SocialService #OBCLeadership #PhuleShahuAmbedkar #LokmanyaFoundation #Falton #DinbandhuNews #SevakKrantiTV #ShankarraoLinge #MaliMahasangh #InspirationalJourney #JansevaHichIshwarSeva
“योगदिनी जन्मलेला संघर्षाचा महामानव; ६8 व्या वाढदिवसाच्या – डॉ. बी. के. यादव यांना अखिल भारतीय माळी महासंघाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिवादन!” 🌹🙏








