महाराष्ट्र

🚨 जातनिहाय जनगणना करा, अन्यथा ओबीसींचा निर्णायक राजकीय इशारा! आता आरक्षण, प्रतिनिधित्व आणि अधिकारांवर तडजोड नाही!

🚨 जातनिहाय जनगणना करा, अन्यथा ओबीसींचा निर्णायक राजकीय इशारा! आता आरक्षण, प्रतिनिधित्व आणि अधिकारांवर तडजोड नाही!

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती गौरव वर्षानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघाने राज्यव्यापी जनजागृती दौऱ्याद्वारे ओबीसी समाजाला ऐतिहासिक संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, देशात तातडीने जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण लोकसंख्येचे वास्तव समोर आल्याशिवाय सामाजिक न्याय, समान प्रतिनिधित्व, आरक्षण, अर्थसंकल्पातील वाटा आणि घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही.

पत्रकानुसार जातनिहाय जनगणना झाल्यास देशातील प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या समोर येईल. शिक्षणातील विषमता, सरकारी व खासगी क्षेत्रातील प्रतिनिधित्व, प्रशासनातील सहभाग, महिला, बालक, वृद्ध, आर्थिक व सामाजिक स्थिती, जमिनीची मालकी, शेती, उत्पन्न, बेघर कुटुंबे, वंचित घटक आणि विकास योजनांची खरी गरज स्पष्ट होईल. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण, निधी, कल्याणकारी योजना, राजकीय प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायासाठी ठोस धोरणे राबविण्याचा मार्ग मोकळा होईल.

पत्रकात ओबीसी समाजाला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जातनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान करू नका. सामाजिक न्याय, समान प्रतिनिधित्व आणि घटनात्मक अधिकारांचा विरोध करणाऱ्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवण्याचा निर्धार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने “जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे” असा ठराव करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

✍️ संपादकीय संदेश

जातनिहाय जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून ती सामाजिक न्याय, समान संधी आणि घटनात्मक हक्कांच्या अंमलबजावणीची मूलभूत पायरी आहे. लोकसंख्या माहीत नसताना संसाधनांचे न्याय्य वाटप होऊ शकत नाही. त्यामुळे लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्व घटकांना न्याय देण्यासाठी जातनिहाय जनगणना हा राष्ट्रीय प्राधान्याचा विषय ठरला पाहिजे.

📲 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
WhatsApp : 7387377801

👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा.
📤 शेअर करा.
▶️ सबस्क्राईब करा.
📲 फॉरवर्ड करा.
💬 कॉमेंट करा.
🔔 बेल आयकॉन दाबा.
📢 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनलची लिंक टच करून चॅनलला फॉलो करा.

#Hashtags

#जातनिहाय_जनगणना #OBC #सामाजिक_न्याय #महात्मा_फुले #OBCReservation #लोकसंख्येनुसार_हक्क #दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीTV #सत्यशोधक_शंकरराव_लिंगे #जय_ज्योतीबा #जय_सावित्री #Constitution #SocialJustice

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button