महाराष्ट्रटॉप न्यूजराजकारण

🔴 सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

🔴 सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वपूर्ण बैठक — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी मंत्रीगट प्रमुख छगन भुजबळ, अतुल सावे साहेब तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार एडवोकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ओबीसी समाजाचे प्रमुख नेते उपस्थित! ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायडे हजर नव्हते कारण त्यांच्यावर खूप टीका झालेली आहे

मुंबई | सह्याद्री अतिथीगृहावर आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्रीगट आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेते यांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील नेते आमदार विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दांत सांगितले की

“सकल ओबीसी समाजाचा १० ऑक्टोबरचा नागपूर मोर्चा माघारी घेतला जाणार नाही!”

वडेट्टीवार यांनी बैठकीत ठामपणे म्हटले —
“हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींचं आरक्षण संपलं आहे. जर आपला डीएनए खरा ओबीसीचा असेल, तर सरकारने २ सप्टेंबरचा जीआर तात्काळ रद्द करावा. हा कुणाच्यातरी दबावाखाली घेतलेला निर्णय असून, जाती-जातींमध्ये भांडण लावणारा आणि महाराष्ट्राला अस्थिर करणारा आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, २०१४ पासून दिलेल्या जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्रांबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी, या दोन्ही मागण्यांवर कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे सकल ओबीसी समाजाचा नागपूरातील १० ऑक्टोबरचा मोर्चा आता ठरल्याप्रमाणेच निघणार आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ओबीसी मंत्रीगट प्रमुख छगन भुजबळ, मंत्री विजयकुमार गावित, संदीपान भुमरे, दादा भुसे, अतुल सावे, तसेच विरोधी पक्षातील विजय वडेट्टीवार, अमोल मिटकरी, आणि महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे विविध मान्यवर नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर उपस्थित नेत्यांनी सांगितले की वडेट्टीवार यांची भूमिका ठाम, तथ्याधारित आणि ओबीसी समाजाच्या हिताची आहे. या चर्चेत राज्यातील ओबीसींच्या भवितव्याशी निगडित अनेक संवेदनशील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

📢 दिनबंधू न्यूज
✍️ संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737801

👉 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सामील व्हा
👍 बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा आणि कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button