✅ ओबीसी आरक्षणासाठी नागपूरात १० ऑक्टोबरला महामोर्चा – शासन निर्णयाविरोधात ओबीसी संघटनांचा निर्धार!

✅ ओबीसी आरक्षणासाठी नागपूरात १० ऑक्टोबरला महामोर्चा – शासन निर्णयाविरोधात ओबीसी संघटनांचा निर्धार!
राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून हा निर्णय आरक्षणावर गदा आणणारा असल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व ओबीसी संघटनांचा महामोर्चा नागपूरात १० ऑक्टोबर रोजी निघणार आहे.
मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियममधून होऊन संविधान चौकात समाप्ती होईल. या मोर्च्यात कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा बॅनर नसेल, फक्त ओबीसी समाज हा आयोजक असेल. शासन निर्णय रद्द करण्याची मागणी मोर्चातून होणार आहे.
शासन निर्णयाविरोधात वकील संघटना देखील एकवटल्या असून नागपूर खंडपीठात याचिका दाखल होणार आहे. मराठवाड्यात भरत कराड या तरुणाने आत्महत्या केली असल्याने संघटनांनी तरुणांना आवाहन केले की टोकाचे पाऊल न उचलता समाजाच्या लढ्यात सहभागी व्हा.
ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यासह शासन निर्णयाविरोधात असणाऱ्यांचे या महामोर्च्यात स्वागत असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यूज
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
बातमी व्हिडिओ लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा | आयकॉन बेल दाबा











