सोशल

मराठा आरक्षण विरुद्ध अॅड. मंगेश ससाणे,प्रा. लक्ष्मण हाके,नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः

मराठा आरक्षण विरुद्ध अॅड. मंगेश ससाणे,प्रा. लक्ष्मण हाके,नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 44

 

आरक्षण : धोरण, वास्तव आणि अपेक्षा

डॉ. सुधाकर शेलार

सध्या आरक्षण या विषयाने एकूणच समाजजीवन ढवळून निघताना दिसत आहे. काही गट आरक्षणाला विरोध करत आहेत, काही गट दुसऱ्याच्या आरक्षणाला विरोध करत स्वतः आरक्षण मागत आहेतः तर काही गट आपलं आहे ते आरक्षण कसं टिकेल, त्यात अन्य वाटेकरी कसे येणार नाहीत या चिंतेत दिसतायेत. ज्यांनी आरक्षणामागील तात्त्चिक भूमिका कधीच नीट समजून घेतली नाही, असे प्रत्येक जातगटातील कार्यकर्ते बेभान होऊन वावदूक विधाने करीत आरक्षणाची मागणी पुढे रेटत आहेत. या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या गटातील तथाकथित उच्चशिक्षितही अनाभ्यासामुळे चिथावणी देत आहेतः तर ज्यांना आरक्षणाचा अर्थ उमगला आहे ते लोक बहुसंख्याक दबावगटामुळे मौन धारण करून आहेत. त्यामुळेच खरे तर आरक्षणाचा मुद्दा ‘वैचारिक पातळी’ वरून ‘भावनिक पातळी’वर येऊन पोहोचला आहे. माणसे एकदा भावनिक झाली, भावनेच्या आहारी गेली की ती विचार करेनाशी होतात आणि मग अशा भावनिक लोकांना अधिक भडकवणे व त्यांच्या या भडकलेपणावर आपली राजकीय पोळी भाजून घेणे चतुर माणसांना बरोबर जमते. त्यामुळे वास्तव माहीत असूनही ही राजकारणातील माणसे सतत लोकानुय करणारी विधाने करून लोकांना वस्तुस्थितीपासून आणखी दूर घेऊन जात आहेत.

आरक्षण हा शब्द ‘प्रतिनिधित्वासाठी जागा राखीव ठेवणे’ या अर्थाने वापरला जातो. धर्मांतर्गत जातिभेदाचा व तथाकथित धर्मतत्त्वांचा आधार घेत अनेक जातगटांची प्रस्थापितांकडून हजारो वर्षांपासून उपेक्षा व अवहेलना केली गेली. भूमी, उत्पादनाची साधने आणि धनसंपत्ती (म्हणजेच भांडवल संचय) पासून त्यांना वंचित ठेवले गेले. काहींची उदरनिर्वाहाची साधने हिरावून घेतली गेली तर काहींची भूमी. त्यामुळे काहींना गावातील प्रस्थापितांची सेवा करावी लागली, तर काहींवर उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या कलांचा आधार घेत गावोगावी भिक्षा मागत भटकंती करण्याची वेळ आली. यातीलच काहींनी पर्यायच न उरल्याने पोट
भरण्यासाठी मृत प्राण्यांचे मांस खायला सुरुवात केली. साहजिकच त्यांचा स्पर्श टाळण्याला सुरुवात झाली… अस्पृश्यता जन्माला आली. या अस्पृश्यतेला धर्माचा मुलामाही दिला गेला. मनुस्मृतीसारख्या ग्रंथात याचे अनेक दाखले आढळतात. ही मनुस्मृती लिहिली कोणी आणि प्रत्यक्षात गावपातळीवर राबवली कोणी हा आपल्या एकूण समाजासाठी आत्मशोधाचा विषय ठरावा. या अस्पृश्यतेमुळे हा समाज अनेक शतके उपेक्षित राहिला. आर्य-अनार्य संघर्षाचीही या उपेक्षिततेला पार्श्वभूमी आहे. हा संघर्ष एक वेगळ्या अभ्यासाचा विषय आहे. मानवाला शेतीचा शोध लागल्यानंतर त्याने नदीकाठी वसाहत केली व

आजूबाजूची जमीन कसायला सुरुवात केली. जमीन कसण्यासाठी अनेक साधने लागत होती. त्याचप्रमाणे जमीन कसणाऱ्याला इतरही अनेक गोष्टींची आवश्यकता होती. जमीन कसणारा हा समूह संख्येने मोठा होता. त्यातीलच काहींनी मग शेतीत असणाऱ्या समूहाच्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळी कौशल्ये वाढून घेत शेतीपूरक साधने पुरवण्याचा व इतर गरजांची पूर्ती करण्याचा उद्योग सुरू केला. यातूनच ‘बारा बलुतेदार’ आणि ‘अठरा आलुतेदार’ उदयाला आले. वस्तुविनिमय पद्धतीमुळे मग या लोकांना त्यांनी पुरवलेल्या सेवेच्या मोबदल्यात शेती उत्पन्नातीलच काही वाटा (पाचुंदा) देण्याची प्रथा सुरू झाली. हा वाटा म्हणजेच ‘बलुतं’, याच व्यवसायाच्या पुढे जाती झाल्या. जमीन कसणारांकडे जमिनीची मालकी आल्याने ते प्रतिष्ठित ठरलेः तर सेवा पुरवणारे दुय्यम ठरले. गावगाड्याची ही रचना नीट समजून घ्यायला हवी. गावगाड्याच्च्त्या आतमध्येच असा दुजाभाव निर्माण झालाः तर वेशीबाहेरच्या समाजगटांची अवस्था त्याहूनही विकट ठरली. माणूस म्हणून जगण्याच्या साध्या प्रतिष्ठेलाही तो मुकला. हिंदूधर्माने सांगितलेल्या चातुर्वर्ण्यव्यवस्थेने केलेली श्रमविभागणी ही केवळ श्रमविभागणी नव्हतीः तर शोषकांनी स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होती. या व्यवस्थेत हजारो वर्षांच्या वाटचालीत कोणताही बदल झाला नाही. राजवटी बदलल्या तरी समाजव्यवस्था मात्र जैसेथेच राहिली. ब्रिटिश आणि त्यांचे आधुनिक शिक्षण इथे आल्यानंतर व्यवस्थेची दारे थोडीशी किलकिली झाली. धार्मिक आणि सामाजिक व्यवस्थेत फारसा हस्तक्षेप न करण्याच्या ब्रिटिशांच्या धोरणामुळे ब्रिटिश काळातही ही व्यवस्था फारशी बदलू शकली नाही.

स्वातंत्र्यानंतर मात्र मानवतावादाच्या पायावर नव्या समाजाची उभारणी करण्याचा संकल्प तत्कालीन नेत्यांनी केल्यानंतर लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संविधानाची निर्मिती करण्यात आली.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button