मसवड उषाताई महेंद्र सतापे यांची राष्ट्रीय सत्यशोधक फेडरेशनच्या एसी विभाग महिला पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा म्हणून निवड !

आमचे सहकारी दिवंगत काशिनाथ आप्पा काटे यांची कन्या उषा महेंद्र सरतापे यांची त्यांच्या पानमळा मसवड घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली त्यांना राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे एससी विभागाचे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष पद बहाल केले याप्रसंगी त्यांचा सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन यांच्यावतीने खारीक खोबऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या या गोड कार्यक्रमाच्याप्रसंगी सूर्यकांत दादा लिंगे एक ट्रान्सपोर्ट व्यवसायातील मोठे उद्योजक बाबा ट्रान्सपोर्ट चे मालक पुणे मुंबई उल्हासनगर या ठिकाणी त्याच्या शाखा असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्यांच्यासोबत लतिका सूर्यकांत लिंगे विशाल सूर्यकांत लिंगे महेंद्र सरतापे कृषीu अधिकारी आटपाडी हे उपस्थित होते सत्काराच्या कार्यक्रमानंतर सहभोजन झाले
उषाताई महेंद्र सरतापे ह्या उच्चशिक्षित असून गेल्या पंचवार्षिक मसवड नगर परिषदेमध्ये त्यांना नगरपालिकेचे निवडणुकीसाठी तिकीट माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब यांनी दिले होते थोडक्यात त्यांची एबी फॉर्मची चुकामुक झाल्यामुळे त्यांचा फॉर्म बाद झाला अन्यथा त्या आज म्हसवडच्या नगराध्यक्ष झाल्या असत्या काही हरकत नाही आता केंद्र सरकारने 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवले आहेत त्यामुळे भविष्यात त्या राखीव जागेतून एससी उमेदवार म्हणून आमदार खासदार ही होतील यात शंका नाही त्यांचा सत्कार करताना शंकराव लिंगे यांना शुभेच्छा दिल्या आणि भावी आमदार खासदार म्हणून त्यांचे अभिनंदन केले समाजकार्यामध्ये त्यांची खूप धडपड आहे त्या समाजकार्य करीत राहतील समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यांना जयकुमार गोरे साहेब येत्या नगरपालिका निवडणूक किंवा त्यानंतर राखीव मतदार संघ झाल्यास आमदार खासदार सुद्धा करतील यात मला शंका वाटत नाही कारण त्यांचे शिक्षण चांगले झालेले आहे
सौ. उषा महेंद्र सरतापे. म्हसवड. तालुका. माण. जिल्हा सातारा. शिक्षण (बीएससी हॉर्टिकल्चर )सामाजिक कार्याची आवड पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार नवी दिल्ली. पत्रकार दर्पण रत्न पुरस्कार. मुंबई महाराष्ट्र राज्य समाजभूषण पुरस्कार मुंबई महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादिका सागर सम्राट असा हा त्यांचा परिचय आहे त्यामुळे त्या सामाजिक शैक्षणिक राजकीय सर्वच क्षेत्रांमध्ये यशस्वी होतील त्या यशस्वी व्हाव्यात हीच फुले शाहू आंबेडकर आणि सिद्धनाथाच्या निर्मिकाच्या चरणी प्रार्थना करतो सत्यशोधक शंकराव लिंगे शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक 94 220 68 771

