सोशल

मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 67

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
67

कारण नाही. लोकशाहीत प्रत्येक जात समूहाला आपल्या न्याय हक्कासाठी कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु अधिकाराच्च्या या लढाईत शक्ती-सामर्थ्याच्या बळावर दुर्बलांच्या अधिकार कक्षेत बळजबरी घुसखोरी करून त्यांच्या अधिकारांचे हनन करणे, विरोध तसेच सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना धमकावणे, त्यांच्या संपत्तीची नासधूस करणे उचित नाही. आरक्षणाचा पाया हा स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांना पूर्ण करणारा आहे, त्याची मागणी करताना इतरांचा द्वेष कधीच न्यायी होऊ शकत नाही. पण पुरोगामी महाराष्ट्रात सध्या ते घडते आहे, हे अत्यंत निंदाजनक आहे. मराठा जातीच्या राजकीय प्रभावाने मराठा ओबीसीकरण झाले तर त्याचे लोण संपूर्ण भारतभर पसरेल आणि मूळ ओबीसी समाज पुनश्च एकदा उद्ध‌वस्त होईल, यात अजिबात शंका नाही.

तेव्हा मराठा जातीने इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता घटनात्मक आरक्षणाची मागणी केली पाहिजे. केंद्र सरकारकडे घटनात्मक दुरुस्तीसाठी शक्तीसामर्थ्य पणाला लावले पाहिजे. लोकभावनेचा विचार करून आरक्षणाची व्याप्ती वाढवायला काहीच हरकत नाही, किंबहुना जातीय जनगणना करून ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ हे तत्व गृहीत धरून सर्वच जाती गटांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले गेले पाहिजे, हाच जातीय संघर्षावरील एकमेव व समन्यायी तोडगा आहे.

शेवटी शासन हे लोकांच्या कल्याणासाठीच असते ही गोष्ट खरी असली तरी, पारंपरिक सत्तातुरांना मुळातच जातीय वर्चस्वाला छेद देणारी ‘आरक्षण’ ही संकल्पनाच मान्य नाही. त्यामुळेच ते जातीय वर्चस्वाचे नेहमी षडयंत्र रचतात. मिः मनोज जरांगे हा या षडयंत्रातील एक प्यादा आहे. प्रस्थापित मराठा सरंजामदार नि जमीनदार हे मि. जरांगेचे नाईट सरदार आणि रेशीम बागेतील संघनायक राजा आहे, हे काही आता लपून राहिलेले नाही. अन्यथा ‘सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन’चा धारकरी मि. मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे हा मि. मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत गेलाच नसता. राजाने मराठा विरुद्ध ओबीसी असा समाज ध्रुवीकरणाचा अत्यंत यशस्वी डाव टाकला आहे. त्यात नक्की चितपट कोण होईल हा येणारा काळच ठरवेल. तथापि समाज ध्रुवीकरणाच्या या कोलाहलात आरक्षणाला मूठमाती देण्यासाठी आवश्यक असणारी मरूभूमि तयार होण्यास मात्र नक्कीच मदत होईल विशेष महत्वाची बाब अशी की,

विद्यमान सत्तेचे धनी हे पारंपरिक विचारधारेचेच वाहक आहेत. त्यामुळे त्यांनी

मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’ची कितीही भीमगर्जना केली तरी ती

एक सर्जनाच्या मृगजळाची भलामनच आहे. अन्यथा या नवउद्योगांमध्ये कारागीर वर्गातून आलेला एक तरी उद्योजक दिसला असता. वर्तमानातील बहुचर्चित विश्वकर्मा योजनेचा मूळ उद्देशही कास्तकारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करणे हा नसून परंपरेने चालत आलेला बंदिस्त जातिव्यवसाय कायम करणे व त्याद्वारे उच्चवर्णीयांचे जातवर्चस्व अबाधित राखणे हाच आहे. या सर्व बाजूचा साकल्याने विचार करता दलित, आदिवासी आणि ओबीसींनी स्वतंत्र राजकीय दिशा सुनिश्चित करण्याची आता निर्णायक वेळ आली आहे. अन्यथा त्यांच्या जीवनात तमोयुग ठरलेलेच आहे.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button