ओबीसी बहुजन पार्टी विधानसभेसाठी राज्यभरात उमेदवार उभे करणार

🟠ओबीसी च्या बातम्या🟠
4) ओबीसी बहुजन पार्टी विधानसभेसाठी राज्यभरात उमेदवार उभे करणार
प्रदेश चिटणीस जाधवर शेंडगे, जिल्हा कायदेशीर सल्लागार यांची माहिती…
आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टीची तयारी झाली असून पार्टीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व जागेवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती ओबीसी बहुजन पार्टीचे प्रदेश चिटणीस अरुण जाधवर यांनी दि.१० ऑगस्ट रोजी धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी ओबीसी बहुजन पार्टी जिल्हा सचिन नाना शेंडगे जिल्हा कायदेशीर सल्लागार शरद राठोड, नामदेव वाघमारे, नवनाथ जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते. ओबीसी बहुजन पार्टी महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी धाराशिवचे सुपूत्र अरुण जाधवर यांची नियुक्ती झाल्याबद्दल शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे ओबीसी युवा मंच, धाराशिवच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश चिटणीस जाधवर यांनी ओबीसींची जिल्ह्यात साडेबारा लाख तर राज्यात ८ कोटी संख्या असल्याचे सांगितले. ओबीसी बहुजन पार्टीकडून लढण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 2-3 उमेदवारांनी पार्टीकडे उमेदवारी मागणीचे प्रस्ताव आले असून त्या संदर्भात मुंबई येथील मुख्यालयात पुढील आठवड्यात बैठक होऊन त्या उमेदवारांच्या मुलाखती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडी व एआयएमआयएम पक्षासोबत युतीसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरु आहे.. तसेच माळी, धनगर व वंजारी अर्थात माधव या घटकांची सर्वच पक्षांनी विशेषतः भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत मतांसाठी वापर करून घेतल्याचा आरोप केला. या सर्व जाती समूहाच्या कल्याणासाठी सत्ताधारी पक्षाने कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप करीत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴




