सोशल

‘पुलाखालून पाणी वाहत असताना शरद पवार शांत का होते? लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांना डिवचलं

🟠ओबीसी च्या बातम्या🟠

3) ‘पुलाखालून पाणी वाहत असताना शरद पवार शांत का होते? लक्ष्मण हाकेंनी थेट पवारांना डिवचलं

गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आंदोलन करत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. दरम्यान, ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केलाय. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. खासदार शरद पवार यांनी ओबीसी आणि मराठा नेत्यांना एकत्र आणून बैठक घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता यावरुन ओबीसी लक्ष्मण हाके यांनी खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. हाके यांनी आज पुंढरपूरात ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आरोप केले.

मोठी बातमीः काँग्रेसचे दोन आमदार रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना भेटले, लवकरच पक्षप्रवेश?

“पवार साहेबांचं अशा पद्धतीच आव्हान म्हणजे लबाडा घरचं आमंत्रण आहे. गेल्या दोन वर्षापासून सर्व पक्षीय बैठका घ्या आणि ओबीसी आरक्षणावर मार्ग काढा अशा पद्धतीचं वक्तव्य शरद पवार साहेब आणि अन्य बरीच मंडळी करत आहेत. पण, जरांगेंना राज्यात कुणी तयार केलं? यावर पवार साहेबांनी उत्तर द्यावं, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला.

“जरांगे नावाचा व्यक्ती राजकारण, समाजकारण आणि समाजाला प्रचंड त्रासाचे ठरणार आहेत. सध्या ग्रामीण भागातील वातावरण बिघडलं आहे. आता पवार साहेबांनी वातावरण एवढं बिघडल्यानंतर बोलणे म्हणजे म्हातारपणी शिंगार केला जाणे. वर्षभर पवार साहेब तुम्ही काय करत आहात? वर्षभर बीड शहर जळत आहे, तुम्ही या वातावरणाचा फायदा घेऊन तुम्ही माणस निवडून देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुम्ही राजकीय पोळी शेकली, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला. ‘आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता तुम्हाला असंल शहानपण सुचलं आहे, पवार साहेब तुम्ही पुरोगामी नेते आहेत. तुम्ही मागासलेपण समाजावर बोला, असंही हाके म्हणाले.

‘मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी’

“आम्ही अशा बैठकीला निश्चित जाऊ, आम्ही कायद्याची भाषा बोलू. आम्ही समाजावर बोलू. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, यासाठी कोणतीही लढाई लढायला तयार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आधी एकट्याने लढावे. ते फक्त २८८ उमेदवारांच बोलतात. परत ते रिमोट कंट्रोलवाल्या नेत्यांना पाठिंबा देतील. जरांगे सारखा माणूस दर दहा मिनिटाला आपली भूमिका बदलत असतो, असा निशाणा लक्ष्मण हाके यांनी साधला.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button