वाचाल त वाचाल

वाचाल त वाचाल
या सत्तेच्या दलालांनी तुमच्या आयुष्याची किंमत किड्यामुंगीसारखी केलीय भावाबहिणींनो. तुमचं जगणं-मरणं ज्यांच्या हातात आहे, अशा आरोग्यसंस्थांकडून भरभक्कम देणग्या उकळल्यात यानी ! कसे रहाणार तुम्ही सुरक्षित? जगण्याची गॅरंटी ज्यांच्या हातात असते, ते जीवनदातेच संशयाच्या भोवर्यात असतील तर बाकीच्या पोकळ गॅरंट्या काय खुट्ट्याला बांधायच्यात?
कोविडकाळात ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शन लै गाजलंवतं. आठवतंय ना? काळ्या बाजारात वीस-वीस पटींनी जास्त पैसे मोजून घेतलं लोकांनी. ते रेमडेसीवीर ‘कोविफोर’ नांवानं तयार करणारी कंपनी होती ‘हेटेरो’ ! जेनरीक ब्रॅन्ड होता. या हेटेरो कंपनीवर इनकमटॅक्सनं छापा टाकला होता. ५५० करोडची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचा आरोप केला होता. त्या ‘हेटेरो’ कंपनीनं नंतर एका बड्या राजकीय पक्षाला ६० करोड रूपयांची देणगी दिली.
त्यानंतर आजवर या कंपनीवर कसलीही कारवाई झाली नाही.
‘यशोदा हाॅस्पीटल’ नांवाची कार्पोरेट हाॅस्पीटल चेन आहे. या हाॅस्पीटलवर डिसेंबर २०२० मध्ये इनकमटॅक्सची रेड पडली. त्यानंतर या यशोदा हाॅस्पीटलने एका मोठ्या राजकीय पक्षाला १६२ करोड रूपयांची देणगी दिल्याचं उघड झालंय. त्यानंतर आजवर या हाॅस्पीटलवर इनकमटॅक्स विभागाने कुठलीही कारवाई केलेली नाही.
डाॅ. रेड्डीज लॅबोरेटरीज. औषधांच्या दुनियेतलं मोठं नांव. आपण आपल्यासाठी, आपल्या आईवडिलांसाठी, कुटुंबियांसाठी या कंपनीची अनेक औषधं घेत असतो. नोव्हेंबर २०२३ मध्ये डाॅ.रेड्डीज कंपनीवर आणि के नागेंद्र रेड्डी यांच्यावर इनकमटॅक्सची रेड पडली.
त्यानंतर या कंपनीनं एका राजकिय पक्षाला तब्बल ८० करोड रुपयांची देणगी दिली आहे !
अरबिंदो फार्मा लिमिटेड. पेनिसिलिनपासून हृदयरोग, डायबेटिस, गॅस्ट्रोएंटरोलाॅजीवरची अनेक औषधं बनवणारी कंपनी. या कंपनीचे डायरेक्टर शरद रेड्डींवर ईडीची धाड पडली. दारू केस आणि मनी लाॅंडरींगचे आरोप झाले. १० नोव्हेंबर २०२२ ला अटक झाली. लगेच पाच दिवसांत या कंपनीकडून राजकीय पक्षाला करोडोंची देणगी गेली. एप्रिल २०२३ मध्ये आणखी मोठी देणगी दिली गेली. टोटल ५२ करोडची देणगी गेल्यानंतर शरद रेड्डी यांना सरकारी साक्षीदार बनवून निर्दोष मुक्त करण्यात आलं.
…तर या आणि अशा औषध-आरोग्याशी संबंधित कंपन्या, राजकीय पक्षांना दिलेला पैसा कुणाकडून वसुल करत असतील??? तुमच्या-आमच्या खिशातनं ! ते ही अनेक पटींनी वाढवून. हे ओळखण्याइतकं आपल्या धडावर आपलं डोकं असायलाच पाहिजे.
‘आरोग्य’ ही आपल्या जगण्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तिथेही जर भ्रष्टाचार पोहोचला असेल आपण स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्यात नीच स्तरावर येऊन पोहोचलो आहोत. देवांची मंदिरं कितीही बांधा. सगळ्यात महान मंदिर हे ‘आरोग्यमंदिर’ असतं. तेच तुम्ही अपवित्र करत असाल तर तुम्ही माणुसकीला लागलेला कलंक आहात. अशा क्रूरकर्म्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही.
अभिनेते किरण माने.
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्याकडे काय महत्त्वाची बातमी असेल याची कोणी दखल घेत नसेल ती बातमी आमच्या नंबर वर व्हाट्सअप वर पाठवून द्या

