सोलापूर

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 12 ते 15 जूनदरम्यान; महिलांच्या खात्यात ₹1500 जमा होण्याची शक्यता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मे 2026 महिन्याचा ₹1500 चा हप्ता 12 जून ते 15 जूनदरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच राज्य सरकारकडून अंतिम निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या रखडलेल्या हप्त्यांनंतर अनेक महिलांना अलीकडेच ₹3000 ची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. ई-केवायसी पडताळणी आणि पात्रता तपासणीमुळे काही हप्त्यांच्या वितरणात विलंब झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता साधारणपणे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत जमा करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता 12 ते 15 जूनदरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनी बँक खाते आधारशी लिंक आहे का, ई-केवायसी पूर्ण आहे का आणि खाते सक्रिय आहे का याची खात्री करून घ्यावी. पात्रता पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 1.70 कोटी महिला लाभासाठी पात्र ठरल्या असून काही लाभार्थी अपात्रही ठरल्या आहेत.

लाभार्थींना पैसे जमा झाले आहेत की नाही हे बँकेचा एसएमएस, पासबुक अपडेट, नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे तपासता येईल.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button