सोशल

*महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा जीवनपट “फुले” चित्रपटाचे वाजत गाजत महात्मा फुलेंच्या कर्मभूमी पुण्यात आणि महात्मा फुलेंच्या पेहरावात स्वागत करणं खूप अविस्मरणीय अनुभव :- ऍड मंगेश ससाणे*

*महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा जीवनपट “फुले” चित्रपटाचे वाजत गाजत महात्मा फुलेंच्या कर्मभूमी पुण्यात आणि महात्मा फुलेंच्या पेहरावात स्वागत करणं खूप अविस्मरणीय अनुभव
:- ऍड मंगेश ससाणे*

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित “फुले” हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. पुणे ही फुले दाम्पत्याची जन्मभूमी आणि कर्मभूमी—अशा या पुणे नगरीत १८व्या शतकात कर्मकांड, अस्पृश्यता, ब्राह्मणवाद, विधवांचे केशवपन यांसारख्या अन्यायकारक प्रथा विरोधात क्रांतीची मशाल महात्मा फुले यांनी पेटवली होती.

या पुण्यात, फुले प्रेमी म्हणून त्यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपटाचे उत्स्फूर्त स्वागत करणे ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचे मी मानले. म्हणूनच काल मंगला थिएटर येथे “फुले” चित्रपटाचा पहिला शो मी स्वतः आयोजित केला.

माझी मनापासून इच्छा होती की फुले दांपत्याच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या चित्रपटाचे स्वागत पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शोभायात्रा काढून करावे. ही संकल्पना आम्ही अल्पावधीत प्रत्यक्षात उतरवली. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले कार्यकर्ते, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि लहान मुलीने सावित्रीमाईंच्या रूपात फुगड्या खेळत केलेले स्वागत… हे सगळं दृश्य अत्यंत भावस्पर्शी आणि उत्साहवर्धक होते.

या शोभायात्रेत माळी महासंघाचे दीपक जगताप, रवी सहाणे व सर्व पदाधिकारी,फुले वेशभूषा सकरणारे रघुनाथ ढोक, राखी ताई रासकर, ओबीसी नेते आनंद कुदळे, महात्मा फुले मंडळाचे मधुकर अण्णा राऊत, सावित्री शक्तिपीठ चे दशरथ कुळधारण, नितीन बोराटे, सुनील शिंदे, रवी चौधरी, मृणाल ढोले पाटील, हनुमंत माळी यांच्यासह ओबीसी रानसंग्राम, ओबीसी वेलफेयर फौंडेशन व पुण्यातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि फुले विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सहभागी सर्वांचे मनःपूर्वक आभार

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा फुले आणि सावित्रीमाईंचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न होता.
आपण सर्वांनी हा चित्रपट कुटुंबासाहीत पहावा,
महात्मा फुले सावित्री फुलेंचे कार्य, संघर्ष,शिक्षित समाजासाठी, मुलीच्या शिक्षण साठी, अस्पृश्य साठी, ब्राम्हण विधवा साठी, दुष्काळात होरपाळ लेल्या जनतेसाठी दिलेले योगदान या चित्रपट च्या माध्यमातून जगामध्ये पोहोचेल याबाबत आनंद वाटतो, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन फुले चित्रपटास व निर्माता त्यांची टीम ला हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद

जय जोती! जय क्रांती! जय सावता! जय भीम! दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button