रूपाली लग्न वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा

रूपाली लग्न वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तेरा वर्षे झालं आपल्याला संसार थाटून. मागील तेरा वर्षांपासून माझ्यासारख्या माणसाला समजून घेत आहेस, सांभाळून घेत आहेस ही खूप मोठी गोष्ट आहे. बऱ्याच वेळा तुझ्याबद्दल लिहीन म्हटलं पण कधी जमलंच नाही. म्हणतात ना रोजच्या माणसाला आपण गृहीत धरतो अगदी तसंच झालं बघ. प्रत्येक वेळी काहीतरी कारणास्तव लिहीणं व बोलणं राहूनच जायचं बघ. तुझं आयुष्यामध्ये येणं खरंतर मला स्थिर करणारं, सावरणारं व माझ्या जीवनाचा अर्थ समजून देणारं आहे. संसार करत असताना एकमेकांना मनापासून वेळ देणे गरजेचे आहे याबाबतीत मी कायमच कमी पडलो. शाळेच्या कामाच्या व्यापात कित्येकदा घरी यायला उशीर होतो. वेळेवर घरची कामं होत नाहीत. सुट्टीच्या दिवशी काही काम असेल तर तुला वेळ देणं होत नाही.
तू खूप समजदार आहेस मागील तेरा वर्षांमध्ये तू एकदाही तक्रार केली नाहीस. तुम्ही उशीर करता, वेळ देत नाही, तू जीवनाकडून असेल, माझ्याकडून असेल कधीच कुठली अपेक्षा ठेवली नाहीस. खरं तर मला तुझ्या स्वभावाचा हेवा वाटतो. ज्यावेळी कधी कामाच्या व्यापामुळे चिडचिड होते त्यावेळी तू शांत राहणं पसंत करतेस. तुझ्या चेहऱ्याकडे पाहून राग आपोआप शांत होऊन जातो. तुझं आयुष्यात असणं सरबतामधल्या साखरेसारखं आहे जी दिसत नाही मात्र चवीचा गोडवा तीच्यामुळेच असतो. भौतिक गोष्टींमध्ये तू कधी रमली नाहीस. नाते जपायला व सांभाळायला तुला मनापासून आवडतं. नातेवाईक, मित्रपरिवार, विद्यार्थी, पालक व घरातील मंडळी सर्वांबद्दल तुझ्या मनामध्ये कायम आपुलकीची भावना असते.
जीवनाचा प्रवास तुझ्यासोबत करत असताना मला विश्वास आहे आपल्या आयुष्यात कधीच कुठला गतिरोधक येणार नाही. जीवन प्रवास तितकाच सुखकर व नितांत सुंदर असणार आहे, कारण तुझ्या कुठल्या अपेक्षाच नाहीत. तू फार चतुर, हुशार, मुरब्बी, मुत्सद्दी अजिबात नाहीस (संसारात, कुटुंबात माणूस असं असूही नये.) पण तू खूप समजदार आहेस. आयुष्यं समाधानाने, आनंदाने जगण्यासाठी समजदारीच खूप महत्त्वाची असते. तुझे कधीही कोणासोबत टोकाचे मतभेद झालेले मी पाहिले नाहीत आणि होणारही नाहीत असा विश्वास आहे. तुला कायमस्वरूपी तुझ्या मर्यादा ही माहित आहेत, ज्या तू कायम पाळत आली आहेस. स्री म्हणून समाजात वावरत असताना कसं वागायला हवं याचा आदर्श वस्तूपाठच तू आहेस. आज जिथे कुठे आपण आहोत त्यामध्ये तुझा सिंहाचा वाटा आहे.
आपल्या संसाराच्या वेलीवर सरल आणि भूमी ही दोन सुंदर व गोंडस फुले फुलली आहेत. त्यांच्या संगोपणामध्ये तू कधीही कसर करत नाहीस. तुला आठवतंय दोघीही लहान होत्या मला शाळेतून यायला उशीर व्हायचा. घरातील सर्व आवरायचं लेकरांनाही पाहायचं पण कधी एखाद्या शब्दानेही तू चिडचिड केली नाहीस. सुदैवानं दोन्हीही लेकरं ही खूप गोड आहेत. त्यांनी कधी आपल्याला त्रास दिलाच नाही की कधी छळलंही नाही. बघ ना आपल्या समजदारीचा नकळतपणे लेकरांवरही चांगला परिणाम पडत असतो. आपण जसे असतो, जसे वागतो तसे संस्कार त्यांच्यावर होत असतात. आई-वडिलांनी शांत, संयमी, समजदार असणं लेकरांच्या भविष्यासाठी किती महत्त्वाचं आहे. अनेक भूमिका तू खूप सक्षमपणे आणि जबाबदारीने वठवत आहेस. खरं सांगू बऱ्याच वेळा तुला खूप बोलायचं असतं कामाच्या व्यापामध्ये मलाच तुला वेळ देणं होत नाही बघ. त्याबद्दल तुझी माफी मागायला अजिबात संकोच वाटत नाही. माझ्याकडून तुझ्या बाबतीत अनेक चुका झाल्या आहेत याची मला जाणीव आहे. त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील.
तू बनवलेली बिर्याणी माझ्यासाठी कायम शाही मेजवानीच असते. आपलं आयुष्यं जगत असताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची तू पुरेपूर काळजी घेतेस. बदलीनंतर गावी आल्यापासून शेतातील सर्व कामं बापू मावशी व कुटुंबातील माणसांबरोबर तू करत आहेस पण तू कधी हट्ट धरला नाही की तुम्हीही शेतात माझ्यासोबत काम करायला चला तरच मी शेतात जाईन. किंवा मी शिक्षकाची बायको आहे मी शेतात काम करत नसते असा उद्गारही कधी तुझ्या तोंडून आला नाही. उलट तुझं कायम हेच सांगणं असतं तुमचं शाळेचं काम ते तुम्ही करा. इकडच्या कामाचा अजिबात विचार करू नका. गोरगरिबांच्या, तळागाळातील मुलांचं शिकणं महत्त्वाचं आहे. शाळा पुढे जाणं महत्त्वाचं आहे. तुझा हा विचार काम करण्यासाठी कायम बळ व प्रेरणा देतो. शाळा पुढे जात आहे याच्यात तुझा खूप मोठा वाटा आहे मला त्याची पुरेपूर जाणीव आहे. तू आहेस म्हणून माझ्या जीवनाला अर्थ आहे. या नियतीने व निसर्गाने तुला माझ्या आयुष्यात पाठवलं याबद्दल मी कृतज्ञ आहे. शेवटपर्यंत सोबत राहू, एकमेकांना साथ देत राहू. आनंदाने जीवन गाणं गात राहू. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.
Love
you dear.Happy_Marriage_anniversary_dear_Rupali
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी
तुझाच……..
लहू…..

