जाहीर आवाहन माढा लोकसभा मतदारसंघ ओबीसी राजकीय आघाडी [OBC, VJNT, SC, ST, Minorities] अध्यक्ष: प्रा. श्रावण देवरे

जाहीर आवाहन माढा लोकसभा मतदारसंघ
ओबीसी राजकीय आघाडी [OBC, VJNT, SC, ST, Minorities]
अध्यक्ष: प्रा. श्रावण देवरे
मतदार बहिणीं भावानों!!
मी, प्रा नारायण तातोबा काळेल, ओबीसी राजकीय आघाडीचा – ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, एस सी, एस टी आणि अल्पसंख्याक यांचा प्रतिनिधी – उमेदवार म्हणून माढा लोकसभेसाठी उभा आहे.
१०/१५ टक्के असलेले वर्ण/जात वर्चस्ववादी, भांडवलदार, सरंजामदार लोक, ८५ /९० टक्के असलेल्या बहुजन – OBC, VJNT, SC, ST and Minorities – लोकांची मतें घेऊन सत्तेत येतात आणि बहुजनांचेच खच्चीकरण करतात.
या कामी आपल्यातीलच दलालांचा मोठा सहभाग असतो.
१५ टक्केवाले बहुजनांचे स्वतंत्र राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण उभे राहू देत नाहीत. आपल्यातीलच लोक त्यांच्या दावणीला बांधले गेले असल्याने आपण विपन्नावस्थेला गेलो आहोत. आपला मानसन्मान खतम झाला आहे.
१) ओबीसींचे गेलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी
२) जातिनिहाय जनगणना करण्यासाठी
३) १०० टक्के मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी
४) शेतकऱ्यांचे प्रश्न स्वामीनाथन आयोग लागू करुन सोडविण्यासाठी
५) कामगार हिताचे कायदे करण्यासाठी
६) महिला सक्षमीकरणासाठी
७)SC, ST and Minorities हित संरक्षणासाठी
८) शिक्षणप्रणालीत अमुलाग्र बदल करण्यासाठी
९) सार्वजनिक आरोग्य सेवेच्या
सक्षमीकरणासाठी
१०) खाजगीकरण थांबवून सरकारी प्रकल्प/उद्योग स्थापन करण्यासाठी. रोजगार निर्मितीसाठी
११) नदीजोड प्रकल्प आणि विज
निर्मितीसाठी
१२) छोट्या व्यावसायिकांना संरक्षण आणि पतपुरवठ्यासाठी
१३) बहुजनांच्या मानसन्मानासाठी
१४) अतिमहत्त्वाचे – संविधान आणि लोकशाही संवर्धनासाठी
मी लोकसभा निवडणूक लढवत आहे. आपण मला मत देऊन निवडून द्या. संसदेत प्रामाणिक आणि कार्यक्षम लोक प्रतिनिधीला पाठवा म्हणजे काय फरक पडतो ते पहा.
आपला कृपाभिलाषी उमेदवार
नारायण तातोबा काळेल
शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा आपल्याकडील महत्त्वाच्या बातम्या समाज उपयोगी लेख फोटो व्हिडिओ ज्या बातम्यांची कोणी दखल घेत नाही अशाही बातम्या आपण आमच्याकडे पाठवा त्यांना प्रसिद्ध देण्याचा जरूर प्रयत्न करू

