सत्यशोधक चळवळीचे गाढे अभ्यासक , संशोधक आणि लेखक प्रा. जी. ए. उगलेसर यांचे निधन ••• भावपूर्ण श्रद्धांजली •••

सत्यशोधक चळवळीचे गाढे अभ्यासक , संशोधक
आणि लेखक
प्रा. जी. ए. उगलेसर यांचे निधन
••• भावपूर्ण श्रद्धांजली •••
~~~~~~~~~~~
अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष,
सत्यशोधक चळवळीचे गाढे अभ्यासक, संशोधक आणि महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सत्यशोधक चळवळ यावर विपुल साहित्यनिर्मिती केलेले ज्येष्ठ लेखक , अभ्यासक व संशोधक प्रा. गणपतराव उपाख्य जी. ए. उगलेसर ( पैठण )यांचे आज सकाळी आठ वाजता दु:खद निधन झाले. गेली दोन वर्षे ते कर्करोगाशी झुंज देत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि कर्करोगाशी सुरू असलेली झुंज आज अपयशी ठरली. प्रा. जी. ए. उगलेसर यांचे ‘सत्यशोधकांचे अंतरंग’ हे पुस्तक खूपच गाजले.
त्याकाळी जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील सत्यशोधकीय चळवळीचे केंद्र आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या सत्यशोधकांचा इतिहास असलेला ‘सत्यशोधकांचे ओतूर’ हा ग्रंथही त्यांनी २०१० साली प्रकाशित केला होता. ‘सत्यशोधकांचे ओतूर’ या ग्रंथाची दुसरी सुधारित आवृत्ती छापून तयार असून प्रकाशनच्या प्रतिक्षेत आहे. सत्यशोधकीय विचारांची समाजाला नितांत गरज असताना सत्यशोधक चळवळीवर विपुल साहित्यनिर्मिती करणारा हाडाचा संशोधक, लेखक आज हरपला. त्यांच्या जाण्याने सत्यशोधक चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे . दिवंगत प्रा .जी.ए. सरांना निर्मिक चिरशांती प्रदान करो हीच प्रार्थना…
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 जयकुमार चर्जन ,
परतवाडा ( अमरावती )
सत्यशोधक, लेखक, विचारवंत आणि महाराष्ट्रातील सत्यशोधकांचा शोध घेऊन त्यांचे सत्यशोधकीय विचार आणि कार्य समाजासमोर आदर्श म्हणून मांडणारे निर्भिड आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रा. जी ए उगले सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे




