क्राईमटॉप न्यूजमहाराष्ट्र

आमदार” सुरेश धस. अंजली दमानी मनोज जरांगे . ‘ इत्यादी नेते सुपारी घेतल्यासारखे खोटे बोलून दिशाभूल करत आहेत ‘संतोष’ देशमुख हत्या प्रकरणात ज्यात चुकीच्या गोष्टी भासवून हत्या अत्यंत अमानुष हत्या झालेली आहे हे दाखवून दुर्मिळ केस दाखवून आरोपींना फाशी मिळावी म्हणून खालील पर्यायांचा अवलंब केला गेला

अय Adv Avinash Dhaygude ,

  1.  आमदार” सुरेश धस. अंजली दमानी मनोज जरांगे . ‘ इत्यादी नेते सुपारी घेतल्यासारखे खोटे बोलून दिशाभूल करत आहेत ‘संतोष’ देशमुख हत्या प्रकरणात ज्यात चुकीच्या गोष्टी भासवून हत्या अत्यंत अमानुष हत्या झालेली आहे हे दाखवून दुर्मिळ केस दाखवून आरोपींना फाशी मिळावी म्हणून खालील पर्यायांचा अवलंब केला गेला

    त्याच्याबद्दलही आपण व्यक्त व्हावे…

१) हत्येमध्ये लाईटरने डोळे जाळले ही चुकीची माहिती होती, याची शहनिशा न करता Suresh Dhas यांनी विधानसभेत ती गोष्ट मांडली. ज्या व्हिडिओला युट्युब वर दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त views आहेत. म्हणजे चुकीची माहिती किती लोकांपर्यंत पोहोचली असेल याचा विचार करा. एका आमदाराने कसलीही शहनिशा न करता कायद्याच्या कनिष्ठ सभागृहात अशा प्रकारची बातमी बोलून महाराष्ट्रभर पसरवणे हा गुन्हा नाही का?

२) काही ठिकाणी तर असा दावा केला गेला की गुप्तांग कापले गेले ही माहिती चुकीची होती! मला जिवंत सोडा मला समाजकार्य करायचे आहे, मी तुमचे कुठेही नाव घेणार नाही असेही दावे केले गेले, माणूस अशा प्रकारचा अमानुष मार खात असताना ह्या सगळ्या गोष्टी बोलतो का?

३) पाणी मागितले असता तोंडामध्ये लघु शंका केली गेली ही माहिती सुद्धा चुकीची होती. वरील तीनही गोष्टीची वाच्यता Vilas Bade Page यांनी @स्टोरी डॉट कॉम या यूट्यूब चैनल च्या मुलाखतीमध्ये उच्चार केलेला आहे.

४) या प्रकरणांमध्ये अंजली दमानीयांना ओढून त्यांचा वापर सणसणाटीसाठी कसा होईल याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली. अंजली दमानियांना स्वतःलाच माहीत नाही की त्यांचा आपोआप वापर केला जात आहे. #anjalidamania

किंवा

अंजली दमानिया ह्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत असतील असा संशय येणे साहजिक आहे. या प्रकरणांमध्ये अंजली दमानियांची विश्वास आर्हता कार्यकर्त्यांच्या नादाला लागून कमी होत आहे हे त्यांच्याच लक्षात येत नाहीये.

५) अंजलीच्या मते बीडचे आरोपी मारले गेले होते, कोणीतरी केलेल्या व्हाट्सअप चा दाखला देत त्या मीडियासमोर येऊन बोलल्या होत्या, जी गोष्ट खोटी निघाली गेली. नंतर आरोपी पकडले गेले.

६) ओबीसींनी जेव्हा औरंगाबादचा मोर्चा परभणी आणि बीड या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ठेवला गेला, बरोबर त्याच दिवशी अंजली दमानीयांनी लक्ष्मण हाके सरांचे ओबीसी आंदोलनादरम्यानचे वाल्मीक अण्णा कराड आणि घुले सोबतचे जुने फोटो प्रसारित करून सणसणाटी निर्माण केली. आणि लक्ष्मण हाके यांचे सुद्धा कसे यांच्यासोबत संबंध आहेत अशा अफवा पसरवण्यासाठी प्रयत्न केले गेला.

७) बीड मधील आरोपी अटक झाल्यानंतर ” एन्काऊंटर ” च्या बातम्यांना खूप जास्त जोर चढला होता.

८) Dhananjay Munde FC Ajit Pawar यांना भेटून आल्यानंतर
” राजीनामा दिला ” ह्या बातम्यांना खूप जास्त जोर चढला होता. वरील सातव्या आणि आठव्या मुद्द्यावरून तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की कशाप्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे.

९) त्यानंतर आता बीडमध्ये 109 मृतदेह आढळले म्हणून मीडियामध्ये सणसणाटी निर्माण केली गेली ज्याकरिता पोलिसांना समोर येऊन त्याबद्दल व्यक्त व्हावे लागले. की हे सर्व वेगवेगळ्या आकस्मात मृत्यूची नोंद आहे म्हणून!
आणि अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या तर पोलीस कार्यवाही होईल.

१०) परभणीमध्ये भाषणादरम्यान एका आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके सरांचा माईक हातातून हिसकाटून घेऊन लक्ष्मण हाके सरांचे भाजपशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. जो नंतर शरद पवारांचा आणि मित्रपक्ष आरपीआयचा कार्यकर्ता आहे म्हणून कळाले.

११) सातत्याने Laxman Hake सर, Pankaja Gopinath Munde , Dhananjay Munde यांना टार्गेट करण्याकडे जास्त कल आहे असे लक्षात येत नाही का? आता या सर्व बातम्यांवर Sandeep Kshirsagar , Jitendra Awhad , Suresh Dhas आपला माणूस हे काहीच का बोलत नाहीयेत?

१२) Manoj Jarange Patil Official यांनी आरक्षणाची मागणी सुरू केल्यापासून किती ओबीसी नेत्यांना कसे कसे टार्गेट केलेले आहे हे तुम्हाला आठवत नाही का?

१३) परंतु आजपर्यंत मनोज जरांगेने आंदोलन चालू केल्यापासून आज पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला ट्रोल होताना पाहिले आहे का?
सुपारी घेऊन स्वतःच्या जातीतले नेते संपवण्याचे बंद करावे असे तमाम धनगर समाजाला वाटते.

१४) लक्ष्मण हाके सरांचे तू समर्थन करू नको किंवा लक्ष्मण हाके सरांच्या कोणत्याही गोष्टीचा विपर्यास करून तू स्वतःचे मराठा जातीतील फॉलोवर्स वाढव, आमचे काहीही म्हणणे नाही. पण लक्ष्मण हाके सरांनी गुन्हेगारीचे समर्थन केले अशी अफवा तरी पसरवू नकोस.

१५) या सर्व गोष्टींवरून हे लक्षात येते की या बीडच्या प्रकरणांमध्ये खूप सार्‍या अफवा खूप सार्‍या खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या जेणेकरून ही केस दुर्मिळ केस आहे असे कोर्टाने समजून आरोपींना फाशी देण्यात यावी असे सगळे एकूण वातावरण तयार केले गेले.

१६) दिल्लीच्या निर्भयाच्या केस मध्ये शेवटी आठ वर्षानंतर फाशी देण्याच्या अगोदर सुद्धा आरोपींच्या जीवनाचा आणि कुटुंबाचा विचार करण्यात यावा असे प्रतिपक्षाने म्हणले होते! जी की देश पातळीवर गाजलेली खरोखरच दुर्मिळ केस होती.

१७) आणि बीडच्या प्रकरणात तर इतक्या सार्‍या खोट्या बातम्या, अफवा यांचा पूर आला होता आता सांगा की बीडच्या प्रकरणांमध्ये आरोपींना फाशी होईल का? कारण बीडच्या हत्येच्या प्रकरणात आंदोलनकर्त्यांनीच उलट्या सुलट्या अफवा पसरवून, हत्ये – संबंधात चुकीची माहिती पसरवून, जनभावनेला प्रक्षोभक बनवून केसचे वजन अत्यंत कमी केलेले आहे.

१८) वरील सर्व गोष्टींमधून संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मागणाऱ्या आंदोलक खरोखरच संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे वाटते का? #santoshdeshmukh

दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button