सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 44

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 44

आगवे बिले गावचे इमानदार यांनी प्रकाशित केला, या ग्रंथाला प्रकाशक लक्ष्मण सावंत यांची एक पानी प्रस्तावनाही आहे. पुढे ओतूरकर सत्यशोधक शास्त्री नारोबाला महाधट पानसरे पाटील यांनी या ग्रंथाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली, तर फार पुढे नागपूरकर सत्यशोधक किसन फागुजी बनसोडे यांनी ‘वेदाचार’ची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. ‘वेदाचार’ ग्रंथासमवेत ‘सत्यदर्पण’ (१८९३) व ‘तमाशा (१८९७) ही ग्रंथसंपदा पंडित थोडिरामांच्या नावावर आहे. मात्र प्रस्तुत दोहों ग्रंथ अनुपलब्ध आहेत. पंडित धोडिरामांची काही फुटकळ पदंही उपलब्ध आहेत. ३ फेब्रुवारी १८९५च्या ‘दीनबंधू’ पत्रात धोडिरामांचे एक पद अबलोकनास येते. शास्त्री महाधटांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथून १९०५ साली ‘जाहीर खबर’ शीर्षकाची एक सतरा पानी पुस्तिका प्रसिद्ध केली होती. या पुस्तिकेत पंडितांचे दोन अखंड आणि एक अभंग समाविष्ट करण्यात आले आहेत. पुढे म्हणजे इ. स. १९१८ मध्ये त्यांचा ‘पेशवाईतील जुलमांचा पोवाडा’ (चार पानी) प्रसिद्ध झाला. या फुटकळ पदांवरही महात्मा फुले यांच्या अखंडाचा

प्रभाव जाणवतो.

अशा या बिनीच्या सत्यशोधकाची समकालीन सत्यशोधक शाहीर भीमराव महामुनी यांनी पुढीलप्रमाणे थोरवी गायली आहे :-

पंडित धोंडिराम नामदेव कुंभार। शंकराचार्यास मारूनी टक्कर ।। केला वाद शास्त्राधार। चेतले जयपत्र मिळविला मोर्तवासिका । झाले सुभेसर ।। अशा या सत्यशोधकाचे इ. स. १९०५ पूर्वी केव्हातरी निधन झाले असावे. संदर्भ – १. वेदाचार-पंडितराव धोंडिराम नामदेव, २. सत्यशोधक हीरक महोत्सव ग्रंथ-१९३३-संपादक माधवराव बागल, ३. महात्मा फुले समग्र वाङ्मय- संपादक-य. दि. फडके, ४. जगावेगळा सत्यशोधक- गुरुवर्य केशवराव विचारे- जयवंत गुजर, ५. आम्ही पाहिलेले फुले- हरि नरके, ६. महात्मा फुले- पं.सी. पाटील, ७. विद्याप्रकाश – भीमराव महामुनी

कुमठेकर विजय
(जन्म-९१०-१९७३)

प्रा. डॉ. विजय कुमठेकर हे उच्चविद्याविभूषित सत्यशोधक असून, ते जालना सत्यशोधक समाज शाखेचे कोषाध्यक्ष आहेत. सत्यशोधक समाजाच्या वतीने प्रारंभ झालेल्या पहिल्या लातूर येथील सत्यशोधक संमेलनापासून ते आठव्या संमेलनापर्यंत ते सातत्याने प्रत्येक अधिवेशन संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यासाठी सत्यशोधक विषयांवर स्मरणिकेसाठी लेख लिहिणे, परिसंवादात सहभागी होणे आदी बाबींवर त्यांचा भर होता. ‘रामनाथ चव्हाण व्यक्ती आणि वाङ्मय’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांना पीएच.डी. मिळाली, त्यानंतर प्रा. विजय कुमठेकर यांच्यावर मराठवाडा प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली.

कुरणे
दत्तात्रय यशवंतराव

सत्यशोधक दत्ताजीराव यशवंतराव कुरणे हे कोल्हापूरकर सत्यशोधक असून राजर्षी शाहू महाराजांकडून आर्थिक साह्वह्य प्राप्त करून त्यांनी कोल्हापुरातून एक बाणेदार साप्ताहिक ‘भगवा झेंडा’ सुरू केले. ‘भगवा झेंडा’ हे साप्ताहिक सत्यशोधकी बाण्याने दर शनिवारी प्रसिद्ध होत असे. हे साप्ताहिक १९२० साली सुरू झाले. याच्या मुखपृष्ठावर भगवा झेंडा असे ठळक मोठे शीर्षक छापले जाई. त्याच्या खालोखाल ‘दर शनिवारी फडकतो’ असा घणाघाती मजकूर प्रसिद्ध होत असे. थोडक्यात, ब्राह्मणेतर आणि सत्यशोधकांवर होणाऱ्या आरोपांना जशास तसे उत्तर ‘भगवा झेंडा’ देत असे. पुढे राजर्षी शाहू महाराज कालवश झाल्यावर दत्ताजीराव कुरणे आणि रावसाहेब बन्ने यांनी शाहू छत्रपतींच्या आठवणीचा ग्रंथ प्रसिद्ध केला.

संदर्भ – लोकराजा शाहू छत्रपती डॉ. रमेश जाधव

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button