महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.38

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.38
नव्याने स्थापन झालेल्या परमहंस सभेचे काही सभासद आपले समानवर्मी आहेत याचा त्यांना प्रत्यय आला. सर्व धर्मग्रंथ मनुष्यनिर्मित, सृष्टी एकमेव ईश्वरदत्त ग्रंथ, सत्यनिष्ठा व नीतिपरता यावर भर, जातिभेद व अस्पृश्यता यांना विरोध, स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह व पुनर्विवाह यांना पाठिंवा इत्यादी बाबतीत परमहंस मंडळी व जोतीराव यांची मते मिळतीजुळती होती. या सभेचे आद्य प्रवर्तक दादोबा पांडुरंग यांच्या ‘धर्मविवेचन’ व ‘पारमहंसिक ब्राह्मचर्म’ या दोन्ही पुस्तकांतील विचारांची बांधणी लक्षात घेतली, तर त्यांच्या पाहण्यात पेनचे ग्रंथ आले असावेत असे म्हणावेसे वाटते. सुरतेस गेल्यावर दादोबांनी धर्मसुधारणेसाठी जी संस्था स्थापली, तिला त्यांनी ‘मानव धर्मसभा’ असे नाव दिले होते. पेनप्रमाणेच दादोबांनीही सत्य आणि नीती यांना आपल्या धर्ममीमांसेत अग्रस्थान दिले होते. ‘सत्य धर्म सांगण्याचा तुमचा उद्योग आहे. तरी त्याचा वृत्तांत लिहून काढा व आपल्याशी सहमत कोण आहेत यांची नोंद करा’ अशी दलपतरामांनी त्यांना सूचना केली होती. परमहंस सभा ही मानवधर्मसभेची धाकटी बहीण होय. परमहंस सभेविषयी जोतीरावांना आपुलकी होती. बावा पदमनजी व भवाळकर हे या सभेचे दोघे सभासद त्यांचे मित्र होते. आपला ‘छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा’ त्यांनी परमहंस सभेचे अध्यक्ष राम बाळकृष्ण यांना अर्पण केला आहे. प्रत्येक समारंभाच्या किंवा बैठकीच्या शेवटी ईश्वराची प्रार्थना करण्याची जोतीरावांचीही रीत होती. या संस्थेची धर्मविषयक विचारसरणी जरी त्यांना बहुतांशी पटत होती, तरी तिचे धोरण व एकंदर कार्यपद्धती ही त्यांना पसंत पडण्याजोगी नव्हती. आपली सर्व चर्चा, ठराव आणि कार्य याबाबत गुप्तता राखण्याची या संस्थेच्या सभासदांची धडपड आणि सभासदांची यादी बाहेर फुटताच त्यांची उडालेली तारांबळ या गोष्टी धर्मसुधारणेच्या कार्याला अत्यंत विघातक होत्या. जोतीरांवांना अशा भ्याडपणाचा स्वभावतःच तिटकारा होता. परक्या मुलखात येऊन खिस्ती धर्मोपदेशक निःशंकपण आपल्या धर्माचा प्रसार करतात. कितीही छळ झाला तरी आपला नित्यक्रम ते सोडत नाहीत. उलट धर्मसुधारणेचे कंकण बांधलेले आपले सुशिक्षित तरूण आपल्याच लोकांत जाण्यास कचरतात हे पाहून जोतीराव खचितच अस्वस्थ झाले असतील. जोतीरावांच्या आयुष्यात
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




