जरांगेंनी धनगरांना प्याद्यासारखं वापरलं…

जरांगेंनी धनगरांना प्याद्यासारखं वापरलं…
१. महादेव जानकर
२. गोपिचंद पडळकर
३. प्रकाश आण्णा शेंडगे
धनगर समाजाच्या राजकीय चेतनेसाठी हे तिन्ही नेते ‘त्रिमुर्ती’ आहेत. या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. तिन्ही नेत्यांवर/ गाड्यांवर कथित मराठा आंदोलकांनी हल्ले केलेत. महादेव जानकर साहेबांच्या प्रचार गाडीवर हल्ला झाला. नंतर मतदानापुर्वी गाडीवर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने जानकर साहेब गाडीत नव्हते.
इंदापूरात पडळकरांनी एका सभेला हजेरी लावली. सभेतून परतत असताना एका ठिकाणी आंदोलक बसले होते. सभेहून परतणाऱ्या पडळकरांवर चप्पल फेक करण्यात आली. यावर तीव्र प्रतिक्रिया इंदापूरचा धनगर समाजाने दिल्या नाहीत. कायदा सुव्यवस्थेचं भान राखलं.
सांगलीत प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या गाडीला चपलेचा हार घालण्यात आला. प्रकाश आण्णा शेंडगे हे दिवंगत शिवाजी बापू शेंडगेंचे चिरंजीव आहे. शिवाजी बापूंमुळे धनगर समाजाला एनटी-सी प्रवर्गात आरक्षण मिळालं होतं.
या हल्ल्यांवर जरांगेंची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. उलट इंदापूरात पडळकरांवर हल्ला झाल्यानंतर जरांगेंनी हात वर केले. मराठा तरुणांनी हल्ला केला नाही म्हणाले. मग जिल्हाधिकाऱ्यांदेखत माफी मागणारे तरुण इराणी होते का? म्हणजे जरांगेंनी पेरलेल्या विषामुळं पोरं हल्ला करणार, हल्ला झाला, अंगलटी येताना काही दिसलं की जरांगे हातवर करणार…कोपर्डी आरोपींवर हल्ला झाला. त्यांच्याबाबतीतही जरांगेंनी हीच टीका केली होती.
बीडमध्ये जे मुंडेंविरोधात वातावरण तापण्याची तयारी फार पुर्वीपासून सुरु झाली होती. अगदी दसरा मेळाव्यापासून. चौंडीत धनगर समाजाने दसरा मेळावा घेतला. त्यात जरांगे प्रमुख पाहुणे होते. हा दसरा मेळावा ज्यांनी घेतला त्यांनी पंकजाताईंविरोधात फॉर्म भरण्याची तयारी केली होती. धनगर विरुद्ध वंजारी वातावरण निर्मितीचे प्रयत्न झाले. इतकंच नाही तर धनगर संघटनेने परभणीत जानकरांच्याविरोधात अर्ज भरला. धनगर समाजाने दबाव वाढवला. यांना अर्ज माघारी घ्यायला लावला.
हे सगळं जरांगेंच्या सांगण्यावरुन झालं नसेल कशावरुन.
आता जरांगेसाहेब गोळी चाटून जाणार वैगेरे बोलत आहेत. उद्या महाराष्ट्रात काही घडलं तर मराठा पोरं अडकतील. जरांगे नेहमीप्रमाणं हातवर करतील किंवा ते मराठे नाहीतच, असं सांगतील. मात्र, या गदारोळात ते पुन्हा धनगरांना गोंजरतील. धनगरांना धनगरांविरोधात उभं करतील. माधव फॉर्म्युला बिघडवतील (या माधवचा अर्थही त्यांना माहीती नाही.) त्यामुळे आगामी दंगली टाळण्यासाठी जरांगेंपासून धनगर समाजाने दुर रहावे!
~ हर्षद शेजाळ
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*




