सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.37

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.37

२४ पेन नुसते लेखन करून थांबले नाहीत; तर ते सैन्यातही दाखल झाले होते. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वी झाले; याचे श्रेय वॉशिंग्टनच्या तलवारीइतकेच पेनच्या लेखणीलाही आहे, याबद्दल त्या काळी कुणालाच शंका नव्हती. पेन यांच्या सर्व लेखनात प्रामुख्याने लोकशाहीच्या मूलतत्त्वांचे विवरण आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर एडमंड बर्फ यांचे ‘Reflection on the Revolution in France’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यातील प्रतिगामी विचारसरणीचे खंडन करण्यासाठी पेन यांनी “The Rights of Man’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिला भाग अमेरिकेच्या संघराज्याचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन यांना अर्पण केला आहे. दुसरा भाग फ्रान्सच्या राष्ट्रीय सैन्याचे प्रमुख लाफायत यांना अर्पण केला आहे. हे दोघेही पेन यांचे मित्र होते. पुढे पेन आणि वाशिंग्टन यांचे संबंध बिघडले. ‘मानवी अधिकार हा शब्दप्रयोग जोतीरावांच्या लेखनात वारंवार येतो. पेन यांच्या ग्रंथामुळे आपल्या देशभक्तिविषयक भ्रामक कल्पना दूर झाल्या असे त्यांनी स्वतःच म्हटले आहे. याच संदर्भात वाशिंग्टन व लाफायत यांचा उल्लेख त्यांनी केला आहे. आपल्याकडे देशाभिमानाची परंपरा नव्हती व अजूनही ती पुरेशी व्यापक व दृढमूल झालेली नाही. देश म्हणजे विशिष्ट भूप्रदेश नव्हे, तर त्यातील लोक, सर्व थरांतील लोक. त्यांचे सुख, स्वातंत्र्य आणि मानवी अधिकार यासाठी प्रयत्नशील असणारे कार्यकर्ते हेच सच्चे देशभक्त होत. खालच्या जातीतील आपल्या देशबांधवांना पशूपेक्षाही नीच समजणाऱ्या लोकांचा देशाभिमान हा अपवित्र देशाभिमान होय. जुन्या धार्मिक परंपरेवर आधारलेल्या आपल्या राजकीय चळवळीपासून खेड्यापाड्यांतील जनसमुदाय अजून लांबच आहे. त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने वागण्याचे आपल्या देशभक्तांना अद्याप अगत्य वाटत नाही. म्हणून खरा पवित्र देशाभिमान अंगी बाणवून घ्यायचा असेल, तर वाशिंग्टन व लाफायत यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला पाहिजे अशी जोतीरावांची भावना होती.

परमहंस सभेशी जवळीक

पेन यांच्या विचारांची ओळख झाल्यावर जोतीराव प्रॉटेस्टंट खिस्ती मताच्या कक्षेतून बाहेर पडले. मुंबई व पुणे येथील सुशिक्षित तरुणांत धर्मविषयक चर्चा चालूच होती. जोतीरावांनी या सर्वांशी नित्य संपर्क ठेवला होता. त्यातून

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button