सोशल

अखिल भारतीय माळी महासंघ नागपूर व क्रांती ज्योती माळी विकास संस्था नागपूर

अखिल भारतीय माळी महासंघ नागपूर व क्रांती ज्योती माळी विकास संस्था नागपूर

[gspeech-button]

दिनांक 21/10/2024

माळी समाज युवक युवती परिचय संपन्न

अखिल भारतीय माही महासंघ व क्रांती ज्योती माळी विकास संस्था नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 आक्टोबर 2024 रोजी गिता मंदीर नागपूर येथे माळी समाजाचे युवक युवती परिचय सम्मेलन संपन्न झाले.

या संमेलनात जवळपास 200 युवक युवती नी आपला विवाहा बाबत परिचय करून दिला व जवळपास 700 उपवर युवक युवती यांनी शुभमंगल पुस्तिकेमध्ये आपले नावे नोंदविली. यावेळी उपवर युवक युवतीचे पालक व माळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

परिचय संमेलन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे विश्वस्त गोविंदराव वैराळे व विठ्ठलराव तोडकर यांचे मार्गदर्शनात सौ. वसुधाताई येणकर सहसचिव क्रांती ज्योति माळी विकास संस्था यांचे अध्यक्षतेखाली श्री मधुसुदन देशमुख नागपूर महानगर अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ

स्वागतअध्यक्ष कैलास जामगडे यांच्या संयोजनात पार पडली. युवक युवतीची परिचय पुस्तिका “शुभमंगलम” चे डॉ. श्री दिलीप पाटील भुजबळ आय पी एस विशेष पोलिस महानिरिक्षक नागपूर परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते प्रकाशित

करण्यात आली.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अशोकराव मानकर प्रसिद्ध उद्योगपती नीलकंठ रावजी यावलकर वरुड माजी , नागपूर विभागाचे कृषि अधिक्षक श्री अरविंद उपरीकर होते. विशेष अतिथी कैलास तानकर माजी प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, श्री अनिल वरेकर, सौ. रोहीणीताई पाटील, डॉ. वामनराव वानखेडे, श्री तुकारामजी निखाडे, श्री निळकंठराव राऊत, श्री गणेशराव मानकर, , अॅड. नितिन देशमुख, डॉ. रामकृष्ण येणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रज्ञा कथलकर यांनी तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय माळी महासंघ नागपूर सरचिटनीस श्री शिवराम गुरनुले यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वश्री अंबादास गाडेकर, विजय सातोकर, गोविंद तितर, कपिल उमाळे, बाळकृष्ण येणकर, अशोक बनसोड, अनिल भेदे, संजय साखळे, गोविंद ठाकरे, रमेश बोबडे, नामदेव लांजेवार, श्री नंदकिशोर पाचपोर, सुभाष लांजेवार, नरेंद्र चिचमलकर, प्रदिप मांदाडे तसेच महिला आघाडीच्या सौ. स्नेहा साखळे, सौ. पुष्पाताई बनकर, सौ. वृषाली ओम वैराळे, सौ. कल्पना बनसोड, सौ. वर्षा चिचमलकर, सौ. कविता भेदे इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले. अशी माहिती संयोजक गोविंदरावजी वैराळे यांनी दिली

दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button