सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.134

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.134
१८९५ सालच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. संदर्भ- १. आम्ही पाहिलेले फुले संपादक हरि नरके
ठोसर
लक्ष्मण देवराव (जन्म सुमारे १८७४)
रावसाहेब देवराव ठोसरांचे एक पुत्र लक्ष्मणराव ठोसरांचा जन्म पुणे येथे इ. स. १८७४ च्या सुमारास झाला. लक्ष्मणराव ठोसरांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे इंग्रजी शाळेत झाले. महात्मा फुले यांच्या वाड्यापासून हाकेच्या अंतरावर देवराव ठोसरांचा वाडा होता (वेताळपेठ). त्यामुळे साहजिकच देवराव ठोसरांचे महात्मा फुले यांच्याकडे जाणे-येणे होते. यशवंतराव फुले आणि लक्ष्मणराव वर्गमित्र असल्याने तेही फुलेवाड्यात नित्यनियमाने जात असत. यशवंतरावांसम लक्ष्मणरावांचे बालपणही महात्मा फुले यांच्या अंगाखांद्यावर गेले.
महात्मा फुले सायंकाळी नियमितपणे यशवंतराव, लक्ष्मणराव आणि त्यांच्या बालमित्रांना शंकरशेठ रस्त्यावर फिरावयास घेऊन जात. हे बालसवंगडी घोरपडे यांच्या समाधीजवळ खेळत असत. या प्रसंगी फिरावयास आलेल्या मंडळींसमवेत फुले सत्यशोधक तत्त्वज्ञानावर चर्चा करीत असत. प्रस्तुत चर्चा लक्ष्मणरावांच्या कानी येत असे. थोडक्यात, बालवयातच लक्ष्मणरावांनी सत्यशोधक तत्त्वज्ञान आत्मसात केले होते.
पुढे सत्यशोधक चळवळीत कार्यरत असताना लक्ष्मणराव पुणे येथील मिलटरी विभागातील अकाऊंटस् विभागात नोकरीस होते. दरम्यान, सत्यशोधक चळवळीत पोषक अशा ‘मराठा स्टुडंटस् ब्रदरहूड’ संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग राहिला. सत्यशोधक लक्ष्मणराव ठोसर, गुरुवर्य बाबूराव जगताप, अंबादास परब, डॉ. हेरॉल्ड मॅन, जगदेवराव पवार, रँग्लर रघुनाथराव परांजपे, सोपान कुऱ्हाडे, रावबहादूर रामचंद्रराव वंडेकर, पां. चि. पाटील आदींनी पुणे येथे १९११ सालच्या फेब्रुवारीत ‘मराठा स्टुडंट ब्रदरहूड’ संस्थेची स्थापना केली
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




