सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.21

सत्यशोधकाचे अंतरंग क्रमशा.21
पडसाद उमटले.
पुढे महात्मा गांधींच्या प्रभावाखाली आलेल्या या बिनीच्या सत्यशोधकाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने काही सत्यशोधक दुःखी झाले. बारामती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या या माजी खासदारांचे १२ नोव्हेंबर १९५९ रोजी पक्षाघाताच्या आजाराने पुणे येथे निधन झाले. संदर्भ- १. सत्यशोधक समाज अधिवेशने चिंतन आणि चिंता- जी. ए. उगले, २. बहुजन समाजातील कर्मवीर- द.स. दरेकर
जेधे
बाबूराव मारुतीराव (जन्म-१८९०-मृत्यू ९ मार्च १९६८)
सत्यशोधक ब्राह्मणेतर कार्यकर्ते पुढारी बाबूराव मारुतीराव जेधे, हे पुणेकर सत्यशोधक ब्राह्मणेतर झुंझार पुढारी केशवराव जेधे यांचे ज्येष्ठ बंधू होत. सत्यशोधक बाबूराव जेधे यांचा जन्म १८९० सालचा असून त्यांचे शिक्षण मराठी पाचवी व इंग्रजी पहिलीपर्यंत झाले होते. बाबूराव जेधे सामाजिक आघाडी सांभाळून केशवराव जेधे यांच्या राजकीय-सामाजिक कार्याला हातभार लावत असत.
जेधे मॅन्शन १९१८ साली बांधून पूर्ण झाले. येथे माणसांचा सतत राबता राहत असे. येणाऱ्या प्रत्येक मनुष्याची ख्याली-खुशाली बाबूराव घेत असत. राजर्षी शाहू महाराजांची पुण्याला आल्यावर जेधे मॅन्शनमध्ये ऊठबस असे. महात्मा गांधीही जेधे मॅन्शनमध्ये येऊन गेले होते.
इ. स. १९२३ सालापासून पुढे जवळपास २१ वर्षे बाबूराव जेधे ‘मराठा शिक्षण परिषद’ संस्थेचे कोषाध्यक्ष होते. शताब्दी साजरी करणाऱ्या या संस्थेच्या यशस्वी वाटचालीत बाबूराव जेधे यांचा खारीचा वाटा आहे. ‘मराठा शिक्षण
परिषद’ समवेत ब्राह्मणेतर परिषदेतही बाबूराव जेधे सहभागी होत असत. विदर्भातील वर्धा येथे वऱ्हाड प्रांतिक सहावी सत्यशोधक परिषद २६ व २७ डिसेंबर १९२९ रोजी भरली होती. या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबूराव जेधे हे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




