महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमाशा.23

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमाशा.23
महात्मा फुले : साहित्य आणि चहवर
१०
जवळीक साधली होती का ? कुणा ढोर कोळ्यांच्या झोपडीत जाऊन त्यांच्या अडचणींची विचारपूस केली होती का ? येथील उच्चवर्णियांनी जे सहसा कधी केले नाही, ते परदेशातून आलेले हे खिस्ती धर्मोपदेशक करीत होते. जोतीरावांना स्वतःलाही त्याचा अनुभव होता. स्वकीयांकडून त्यांची अवहेलना झाली, त्यांच्या कार्यात अडथळे आणले गेले. पण ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी त्यांना सहानुभूती दाखवली, उत्तेजन दिले, साह्य केले. त्यांच्याविषयी जोतीरावांना आदर वाटला आणि ज्या धर्माने त्यांना जनसेवेचीही प्रेरणा दिली, त्यांचे खरे स्वरूप समजून घेण्याची त्यांना इच्छा झाली, तर त्यात काहीच आश्चर्य नाही.
महाराष्ट्रात अमेरिकन मिशन, स्कॉटिश मिशन, लंडन मिशनरी सोसायटी, चर्च मिशनरी सोसायटी इत्यादी अनेक संस्था खिस्ती धर्मप्रचाराचे कार्य करीत होत्या. या सर्व संस्थांचे कार्यकर्ते एकोप्याने व परस्पर सहकार्याने काम करीत होते. त्यासाठी बॉम्बे मिशनरी युनियन, मुंबई बायबल सोसायटी, वॉम्बे ट्रॅक्ट अॅन्ड बुक सोसायटी, मुंबई टेंपरन्स सोसायटी इत्यादी व्यापक संस्था स्थापन झाल्या होत्या. स्कॉटिश मिशनचे धर्मोपदेशक इ. स. १८२२ मध्ये मुंबई इलाख्यात प्रथम आले. त्यानंतर एकामागून एक जे उपदेशक आले, त्यांत जेम्स मिचेल, जॉन स्टिव्हेन्सन, रॉबर्ट निज्विट, जॉन विल्सन, मरे मिचेल हे प्रमुख होते. सर्व धर्मोपदेशकांच्या कार्यपद्धतीत एकसूत्रीपणा होता. ज्या प्रदेशात प्रचार करायचा, त्यातील लोकांची भाषा आत्मसात करणे अत्यावश्यक आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणून येथे आल्यावर अल्पावकाशातच ते मराठी शिकले. इतर कार्यकर्त्यांना ती शिकणे सोपे जावे म्हणून त्यांनी मराठीचे कोश व व्याकरणे रचली. स्टिव्हेन्सन, विल्सन, मिचेल यांना अनेक देशी भाषा अवगत होत्या. हिंदूंचे धर्मग्रंथ पाहता यावेत म्हणून त्यांनी संस्कृतचाही अभ्यास केला. रॉबर्ट निज्विट यांची तर मराठीच्या बिनचूक उच्चाराविषयी विशेष ख्याती होती. त्यांचे प्रचारकार्य पद्धतशीर व योजनाबद्ध होते. ठिकठिकाणी त्यांनी आपली केंद्रे उघडली. छापखाने घातले. बायवलचा सुबोध मराठीत अनुवाद करून तो प्रसिद्ध केला. खिस्ताच्या तत्त्वप्रणालीवर आधारलेल्या लहान लहान पुस्तिका लिहून त्यांच्या शेकडो प्रती मोफत वाटल्या. हे वाङ्मय
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01 हा हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा फॉरवर्ड करा, कॉमेंट करा रा शेअर करा सबस्क्राईब आयकॉन बेल दाबा




