शरणागाथा क्रमशा.20

शरणागाथा क्रमशा.20
धर्म अधिक महत्त्वाचा ठरू लागला आहे. त्यामुळे अनेक शतके त्यावर साचलेली ब्राह्मणी धूळ झटकून मूळ विचारांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आकार घेतोय. त्यासाठी डॉ.एम.एस. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या विचारवंतांनी हौतात्म्यही दिलेय. लिंगायत विचारांचा जागर करण्याचे महत्त्व या सगळ्यानी अधिक स्पष्ट केले आहे. ही शरणगाथा याचाच एक भाग आहे, म्हणून महत्त्वाची आहे.
या विचारांची गरज इतकी आहे की, चन्नवीरच्या या पुस्तकाला कोणत्याही वेगळ्या प्रस्तावनेची गरज नाही. माझ्यासारख्या पत्रकाराच्या प्रस्तावनेची तर नाहीच नाही. तरीही केवळ चन्नवीरच्या आग्रहाला बळी पडून मी हे धाडस केले आहे.
भालकी येथील महाराष्ट्र बसव परिषदेने डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या मार्गदर्शनात कन्नडमधील लिंगायतविषयक लेखन मराठीत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. ते एक महत्त्वाचे योगदान आहे. पण ही पुस्तके लिंगायत चळवळीतल्या कार्यकर्त्यांपलीकडे पोहोचण्याची गरज आहे. त्यादृष्टीनेही चन्नवीरसारख्या पत्रकाराने मराठीत जास्तीत जास्त लिखाण करण्याची गरज आहे. त्यातून लिंगायत धर्मचळवळीचा जागर महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकेल. त्यातून आजच्या महाराष्ट्राने प्रेरणा घेतली तर वारकरी आचारविचारांवरची ब्राह्मणी धूळ झटकण्याची गाडगेबाबांची परंपरा पुन्हा एकदा बहरू
शकेल.
सचिन परब संपादक, रिंग
शिवक्रांती टीव्ही
दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




