राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी विविध मागण्यासाठी उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्या मुंबईतील बंगल्याला घेराव घालणार!…..

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी विविध मागण्यासाठी उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्या मुंबईतील बंगल्याला घेराव घालणार!…..

दिनांक२४/०९/२०२४
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या मुंबई येथील बंगल्यावर घेराव आंदोलन *
मा.ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा.ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा.ना. गिरीषजी महाजन ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजुर न झाल्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या मुंबई येथील बंगल्यावर घेराव आंदोलन करणे बाबत.
मा. महोदय,
विनंती की, राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ व ग्रामसेवक आणि ग्राविअ यांचे पदनाम पंचायत अधिकारी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे मनापासून अभिनंदन. परंतु राज्यातील २७९२० ग्रामपंचायतीमध्ये काम करीत असलेल्या सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांचे वेतनाचा प्रश्न मागील २० वर्षापासून प्रलंबीत आहेत. सतत २ वर्षापासून आश्वासन देवूनही न्यायन मिळाल्यामुळे राज्यातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यात तिव्र असंतोष निर्माण झालेला आहे.
करीता सोमवार दि. ३०/०९/२०२४ व मंगळवार दि. १/१०/२०२४ रोजी मुंबई येथे ८) उपमुख्यमंत्री यांचे सागर, पर्णकुटी व ग्रामविकास मंत्री यांचे सेवासदन या बंगल्याला राज्यातील ३० जिल्ह्यातून १० हजार ग्रामपंचायत कर्मचारी घेराव आंदोलन करणार आहेत. करिता आमच्या खालील मागण्याबाबत सकारात्मक भुमिका घेवून मंजुर कराव्या.
१ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न.प. व जि.प. कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजुर करणे बाबत
२. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागु करणे बाबत
३. किमान वेतनाच्या अनुदानाची १९ महिण्याची थकीत रक्कम (एरीयस) शासनाने मंजुर करुनही अद्याप मिळालेला नाही.
४ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करणेबाबत
५ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करणे बाबत
८ ग्रामपंचायत कर्मचारी १०% आरक्षणानुसार भरती करत असतांना दरवर्षीचे रिक्त पदावर अनुकंपा चे धरतीवर करण्यात यावी तसेच महत्वाचे ३४ सही जिल्हा परिषद मधे नियमित व एकाच नियमाच्या आधारावर करण्यात यावी. इत्यादी मागण्या घेऊन आझाद मैदानावर हजारो कर्मचारी आंदोलन करीत होते
करिता आपणास नम्र विनंती की, वरील मागण्यांच्या बाबतीत शासनाने त्वरीत निर्णय घेवून मागण्या मंजुर करण्यात याव्या करीता सादर.
आपले विनीत
(दिलीप डिके)
(विकास भोईर)
(काजी अल्लाउद्दीन)
(गिरीश दाभाडकर)
उपाध्यक्ष
कोषाध्यक्ष
राज्य कार्याध्यक्ष
राज्य सरचिटणीस
(नारायण होंडे पाटील) (दत्तात्रय भोईर) (सपनाताई गांवडे) (अशोक कुथे) (नागसेन खंडारे)
उपाध्यक्ष
उपाध्यक्ष
उपाध्यक्ष
सचिव
सहसचिव
(जयदेव अंबुलकर) वि. अध्यक्ष, नागपूर
(एकनाथ किर्तीकर) वि. अध्यक्ष मराठवाडा
(मंगेश ढोरे) वि. अध्यक्ष, अमरावती
(नामदेव पावशे) वि. अध्यक्ष, नाशिक
(डिगांबर सोनटक्के) राज्य संपर्क प्रमुख
(संतोष शिंदे)
वि.सचिव मराठवाडा
(यशवंत इंगळे) वि.सचिव, अमरावती
(आत्माराम घुणे) वि. सचिव, नाशिक
(अभय सावंत)
वि. सचिव कोकण
(अतुल बढे) वि.सचिव, नागपूर
(सतिश पाटील) राज्य संघटक
(वसंत माने) राज्य सदस्य इत्यादी मान्यवरांच्या सहीने शासनास पत्र सादर केले आहे
प्रतिलिपी :
१) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन
२) मा. प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग
३) मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र मुंबई
४) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.
सर्व
५) मा. पोलीस अधिक्षक, . सर्व जिल्हा इत्यादी अधिकारी यांना माहितीस्तव पत्राने कळविले आहे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01



