श्रीगोंदा तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष व अखिल भारतीय माळी महासंघाचे. जिल्हाध्यक्ष माननीय निवृत्ती तुकाराम शेलार सर यांच्या मातोश्रीं निसर्ग विलीन श्रीमती कृष्णाबाई तुकाराम शेलार🙏🏻 यांचे 31 /10/ 2023 रोजी निसर्गात विलीन झाल्या त्यांचा अंत्यविधी त्यांचे घरासमोर शेतात करण्यात आला*

आज दिनांक 1/ 11 /2023 रोजी सकाळी आठ वाजता त्यांच्या घरासमोर अस्थी रक्षा सावरण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी अस्थिरक्षा घरासमोरील समोरील प्रांगणामध्ये खड्डे खोदून आंब्याचे🌳 स्मृती रुक्ष लागवड केली त्यावेळी गावातील तसेच पै पाहुणे सर्व हजर होते हा उपक्रम स्तुत्य असून याची भविष्यात गरज आहे कारण अशा स्तुत्य उपक्रमामुळे आपल्या पूर्वजांच्या अस्थिरक्षा कुठेही सध्या कारखानदारीच्या प्रदूषित पाण्यामध्ये न टाकता आपल्याच शेतामध्ये घरासमोर ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचे आयुष्य सुंदर आनंददायी अशा घरासमोर त्याच्या पावन भूमीत झालेला असतं त्यामुळे शेवट कुठल्याही नदीमध्ये टाकले तरी त्या अस्थिरक्षाची विटंबनाच होते
कुठल्याही नदीचं पाणी प्रदूषितच झालेल आहे आणि आपण त्यामध्ये पुन्हा प्रदूषणाची भर घालता होत हे कुठेतरी मनाला पटत नाही आणि म्हणून सध्या सत्यशोधकीय अनुयायांनी हा उपक्रम चालू केला असून त्यास प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे अशा उपक्रमांची नोंद घेत जर आपण आपल्या ग्रामपंचायत यामध्ये मृत्यूच्या नोंदी बरोबर केली तर याचा मोठा फायदा यापुढील काळात होऊ शकतो तो असा की शासन आपल्याला वृक्ष लावा वृक्ष जगवा पाणी आडवा पाणी जिरवा ही उपक्रम करोडो रुपये खर्च करून देत असून
त्यामध्ये हा उपक्रम जर जोडला तर अंधश्रद्धेलाही काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल अशी मागणी आम्ही येणाऱ्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे करत आहोत यावेळी ग्रामपंचायतचे भावी सरपंच उपसरपंच सदस्य उमेदवार हजर होते हजर असलेल्या बहुतेक सर्वांनाच हा उपक्रम अगदी स्तुत्य वाटला आणि त्याची भरभरून स्तुती करून यापुढे अशा प्रकारेच आपण सत्यशोधकीय उपक्रम हाती घेऊन हे कार्य पुढे नेऊया अशी भावना व्यक्त केल्या
मातोश्री कृष्णाबाई तुकाराम शेलार यांच्या पाठीमागे फार मोठा गोतावळा आहे पैकी
श्री निवृत्ती शेलार मुलगा
श्री मारुती शेलार मुलगा
सौ सिंधुताई रसाळ मुलगी
सौ इंदुबाई रायकर मुलगी
सौ सीताबाई खामकर मुलगी
सौ संगीता इधाटे मुलगी
कु प्रसाद शेलार नातू
कु ओंकार शेलार नातू असा आणखी मोठा परिवार असून *मातोश्री कृष्णाबाई तुकाराम शेलार यांचा दशक्रिया विधी दिनांक 9/ 11 /20 23 रोजी आठ वाजता मुक्काम लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे दशपिंडी दशक्रिया महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाज नुसार होईल* विनित श्री निवृत्ती तुकाराम शेलार श्री मारुती तुकाराम शेलार
✒️सत्यशोधक भिमराव कोथिंबिरे
🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻




