बीड जिल्ह्यातील जाळपोळ तोडफोड मुळे ओबीसी भयभीत एससी एसटी प्रमाणे ओबीसींना ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे संरक्षण द्यावे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनची मागणी

परवा बीड मध्ये सुभाष राऊत व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आण्णांची भेट घेतली. सरकार पुरस्कृत मराठा गुंडांनी जाळून राखरांगोळी केलेले घर व हॉटेल पाहीलं. ज्यांचा मेंदू डोक्यात व हृदय छातीत आहे, अशा कोणत्याही सुज्ञ व्यक्ती ही जाळपोळ पाहुन सुन्न होतेच! सोबत शंकरराव आण्णा लिंगे होते… ते हॉटेल मध्येच ढसढसा रडू लागले व सुभाष राऊत यांच्या गळ्यात पडले… मनात एक प्रश्न सहज उभा राहिला… “माणसं एवढा रानटीपणा आणतात तरी कोठून? तो त्यांच्या रक्ताचाच गुणधर्म असतो
नंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन दिले व मराठा गुंडांच्या मुसक्या आवळून फासावर लटकवण्याची मागणी करण्यात आली.. नंतर विशेष तपास पोलीस अधिकारी याचीही भेट घेऊन निवेदन दिले..

बीड ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्या समवेत गौतम क्षीरसागर प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर बीड जिल्हाध्यक्ष अभा माळी महासंघ बापूसाहेब भंडारे समता परिषद उपाध्यक्ष सोलापूर अमोल माळी मोहोळ तालुका अध्यक्ष समता परिषद रमेश दुधाळ श्री हॉटेल बीड इत्यादी मान्यवरांनी बीड जिल्हाधिकारी बीड जिल्हा पोलीस प्रमुख बीड जिल्ह्याचे माझी पालकमंत्री माननीय जयदत्त अण्णा क्षीरसागर यांना मराठा पाचशे गुंडांनी बीडमध्ये केलेली तोडफोड घातलेला होता ओबीसी नेते आणि ओबीसी उद्योजक यांना केलेले टार्गेट त्यातून झालेले हजारो कोटीचे नुकसान याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले



