सोशल

ओबीसी संघर्ष योद्धे मा. नवनाथ आबा वाघमारे यांनी घेतली धनगर समाज उपोषण कर्त्यांची भेट…!

ओबीसी संघर्ष योद्धे मा. नवनाथ आबा वाघमारे यांनी घेतली धनगर समाज उपोषण कर्त्यांची भेट…!

पंढरपूर येथे चालू असलेल्या धनगर समाज ST आरक्षण आमलबजावणी साठी महाराष्ट्रातील सहा धनगर बांधव गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. यामध्ये उपोषण कर्ते श्री. दिपकभाऊ बोऱ्हाडे यांची प्रकृती अत्यंत खालवली आहे परंतु आत्तापर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची या उपोषण करणाऱ्या बांधवाची दखल घेतलेली नाही म्हणून आज ओबीसी संघर्ष योद्धे मा. नवनाथ आबा वाघमारे व श्री.ह.भ.प रमेश महाराज वाघ तसेच मा. सरपंच प्रल्हादराव शिंदे व बंटी मुळे यांनी उपस्थिती लावली,यावेळी संघर्ष योद्धा मा.नवनाथ आबा वाघमारे यांनी मार्गदर्शन करताना सरकारने या आंदोलनाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केलेले आहे

म्हणून आपण या सरकारचा जाहीर निषेध करून या सरकारला जागं करण्याचं काम करण्यासाठी सकल धनगर समाज बांधवांना आश्वासित केलेले आहे जोपर्यंत आपण या सरकारला धारेवर धरत नाहीत तोपर्यंत हे सरकार धनगर एसटी आरक्षणाकडे दुर्लक्ष करत राहणार आहे हे सरकार फक्त जरांग्याचे लाड पुरवणारे सरकार आहे

असे उद्गार यावेळी मा.नवनाथ आबा वाघमारे साहेब यांनी काढले तसेच श्री. ह.भ.प. रमेश महाराज वाघ यांनी मार्गदर्शन करत असताना धनगर समाज बांधवाला संबोधित करत असताना आपण केलेल्या समाजाप्रती त्यागाचं कौतुक करून आपण आपल्या उपोषणावर ठाम राहावं जेणेकरून या सरकारला घाम फुटेल आणि सरकारला विषय दिला आहे

जर आपण या धनगर बांधवांची दखल घेतली नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सकल ओबीसी समाज व धनगर बांधव आपली सत्तेची खुर्ची चंद्रभागेमध्ये बुडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून यावेळी महाराष्ट्रातील अनेक तालुक्यातील शिष्ट मंडळ या धनगर बांधवांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत आहे आणि पाठिंबा वाढत आहे तरी माझी सकल धनगर बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने जाऊन उपोषण स्थळी उपोषण करत असलेल्या बांधवांना समर्थन द्यावे ही नम्र विनंती…!!

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button