सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.20

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा.20

महात्मा फुले जडणघडण

धर्मोपदेशकाकडे मुले सांभाळण्याची नोकरी धरली होती. त्यामुळे खिस्ती धर्मोपदेशकांच्या समर्पित जीवनाचे त्यांना अगदी जवळून दर्शन घडले. त्यांच्या कार्यक्षमतेचा व सेवावृत्तीचा त्यांच्या मनावर खोलवर ठसा उमटला होता. जोतीराव हे एक वर्षाचे होण्यापूर्वीच त्यांची आई कालवश झाली होती. तेव्हापासून सगुणाबाईने पोटच्या पोराप्रमाणे त्यांचा सांभाळ केला होता. त्यांनी केवळ त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली असे नाही, तर त्यांच्या मनावर त्यांनी मानवताधर्माचे संस्कार केले. गोरगरिबांची सेवा हीच ईश्वराची उपासना हे तत्त्व त्यांना पटवून दिले. “आपल्या जोतीबाने खिस्ती फादरसारखे व्हावे आणि त्याच्या हातून गोरगरीब व महारमांग समाजाची सेवा व्हावी, अशी सगुणाबाईची मनोमन इच्छा होती. जोतीरावांच्या घडणीतील त्यांचा हा कार्यभाग निःसंशय गौरवास्पद आहे.

स्कॉटिश मिशनच्या शाळेत गेल्यावर जोतीरावांच्या धर्मचिंतनाला खरोखर प्रारंभ झाला. एकेश्वरवाद हे येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचे एक प्रमुख अंग आहे. त्यामुळे साहजिकच खिस्ती धर्मोपदेशकांच्या प्रचारमोहिमेचा तो केंद्रबिंदू बनला. या चराचरसृष्टीचा जनक जो परमेश्वर तो एकच एक अद्वितीय आहे आणि तोच काय तो अनादिसिद्ध आहे. त्यानेच आपल्या अमोघ शब्दशक्तीने शून्यातून ही जड व सजीव सृष्टी निर्माण केली आहे. त्याने न निर्मिलेले असे या जगात काहीही नाही. मात्र या समग्र सृष्टीत एकजिनसीपणा नाही. मनुष्येतर सृष्टी व मनुष्ययोनी यांच्या घडणीत मूलभूत फरक आहे. ईश्वराचे सार्वकालिक अस्तित्त्व आणि त्याचे अगाध कर्तृत्व यांची जाणीव फक्त माणसालाच होऊ शकते. ईश्वर हा निष्कलंक व सर्वार्थाने परिपूर्ण आहे. सृष्टी आणि सृष्टिकर्ता ही तत्त्वतः अभिन्न आहेत, असे प्रतिपादन करणारे अद्वैतमत हे चुकीचे आहे. तसेच जीव हा परमेश्वराचा अंश आहे हा सिद्धांतही सत्याला धरून नाही. असे असले तरी ईश्वरावर प्रेम करण्याचा, त्याची मनोभावे सेवा करण्याचा अधिकार फक्त मनुष्यमात्राला आहे. तेव्हा त्याचा यथोचित वापर करण्याची नैतिक जबाबदारी अर्थातच त्याच्यावर येऊन पडते. सगळी लहानथोर माणसे ही ईश्वराची लेकरे आहेत, तेव्हा सर्व स्त्री-पुरुषांनी एकमेकांशी बहीणभावांच्या नात्याने वागले पाहिजे. ईश्वराचे पितृत्व आणि

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक
सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button