मी हारत नाही… मला तुम्ही हरवता

मी हारत नाही…
मला तुम्ही हरवता
अत्यंत वेदना देणारे हे विधान काल ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेड येथील कर्मचाऱ्यांशी हितगुज करताना काढले….
जिंकत आलेली लढाई मला हारायची नाही असे म्हणताच. काँग्रेस, राष्ट्रवादीने आमच्या निवृत अधिकारी वर्गास गाठून फतवे काढण्यास भाग पाडले. या अधिकारी वर्गाने त्यांचे का ऐकले असेल असा प्रश्न आपणास पडू शकतो. याचे कारण हे आहे की आमचा अधिकारी वर्ग काँग्रेस, राष्ट्रवादी सरकार सोबत अनेक उलाढाली केल्या.
सर्वांचे कळेबेरे धंदे जाणत्या राजाकडे टिपून आहेत… त्या भीतीपोटी आमच्या अधिकारी वर्गाने फतवे काढले. नात्यागोत्यातली भोळी भाबडी माणसे यांच्या अपप्रचारला बळी पडून काँग्रेस, राष्ट्रवादी च्या पारड्यात भरभरून मते टाकली. आणि जिंकत आलेली लढाई आम्ही हरलो. संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे ही सारी भुलथाप होती. संविधान धोक्यात आहे. आम्ही संविधान वाचवू म्हणणारे कोर्टाने क्रिमिलीयर लावली आणि सारेच बिळात लपले.
खुद्द त्यांची मुलं आता आरक्षणाच्या बाहेर पडली. आता त्यांचं कसं होणार? यांनी कामावलेली पुंजी किती दिवस पुरणार? यांनी अधिकारावर असताना कोणती पतसंस्था काढली नाही. कोणता उद्योग स्थापित केला नाही. कुठे शाळा कॉलेज काढले नाही… ऐपत असूनही अनेकांनी आपल्या पोरांना उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले नाही.चळवळीसाठी एक रुपया दिला नाही.संडे म्हणजे मटण डे झाला. चळवळ गेली……….
1957 पासून 1993 पर्यंत रिपब्लिकन पक्ष केवळ एका जातीपुरता मर्यादित झाला होता.. बाहेरचा एकही माणूस जोडला गेला नाही.. 1993 पासून बाळासाहेब आंबेडकर यांनी बहुजन महासंघाच्या माध्यमातून बारा बलुतेदार एकत्र जोडून चळवळीच्या कक्षा रुंदाविल्या. Sc. St. Obc आता वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली एकवटला आणि लोकसभा इलेक्शन ला सामोरे जात होता आणि इकडे आमची फतवा गँग फतवा घेऊन फिरत होती.
युती करा म्हणणारे अगोदरच वाड्यावर पोचले होते. वाटघाटी चालू होत्या. सारे च्या सारे राष्ट्रीय अध्यक्ष होते. जाणत्या राजाला वाटले की एवढी गँग आपल्या सोबत असताना वंचितवाल्याना कशाला भागीदार करून घ्या? मग सुरु झाली बोलणी 2 देतो, तीन देतो. आमच्या राजाला असली भिकारचोट चर्चा आवडली नाही आणि पुढचा इतिहास आपणास ठाऊक आहे. वंचित वर बी टीमचा आरोप करणारे रोज रोज रखानेच्या रखाने भरून बदनामी कारक लेख लिहू लागले… वंचित कशी अडमुठी आहे, हेकेखोर आहे याची टिमकी वाजवू लागले. पण एकाची ही हिम्मत झाली नाही की मालकाने वंचित सोबत सन्मानजनक वाटाघटी कराव्यात म्हणून…
एकटी वंचित कशी दोषी असू शकते? पगारातला एक रुपया कमी आला तर ओरड करणारे , आपल्या इनक्रेमेन्टसाठी, डी. ए. साठी, प्रमोशन हक्क अधिकारासाठी सरकाला भांडणारे वंचितला एक दोन जागा घेऊन चूप बसा म्हणत होते…पण सन्मानजनक जागा द्या अन्यथा आम्ही वेगळा विचार करू असे म्हणण्याची हिम्मत एकाही जिगरबाजला झाली नाही.
Sc. St. Obc च्या एकजुटीने जिंकत आलेली लढाई अशाप्रकारे वंचित हरली. म्हणून बाळासाहेब आंबेडकर काल म्हणाले की मी हारत नाही, तुम्ही मला हरवता
आता विधानसभा आणि नांदेड लोकसभा पोट निवडणुकीत
आम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल. बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेड लोकसभा लढवावी असा आम्ही त्यांच्याकडे आग्रह धरलेला आहे. जर बाळासाहेब आंबेडकर येथून उभे राहिले तर त्याचा फायदा नांदेड जिल्यातील सर्व विधानसभा मतदार संघात होईल. प्रत्येक मतदार संघात चौरंगी लढत होणार आहे. त्यामुळे जिंकण्याची फार मोठी संधी आहे.आता कोणी फतवे काढण्याच्या भानगडीत पडूनये आणि त्यांच्यावर कोणी विश्वास ही ठेऊ नये…..
गणपत गायकवाड नांदेड
9527881901
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा




