सोलापूर

🔴 गायकवाड आयोगासमोर ओबीसी भूमिकेमुळे हल्ला – शासकीय विश्रामगृहात केमिकल शाई टाकून डोळे निकामी; एक कोटी नुकसानभरपाई व कलम 307 ची मागणी

@

🔴 गायकवाड आयोगासमोर ओबीसी भूमिकेमुळे हल्ला – शासकीय विश्रामगृहात केमिकल शाई टाकून डोळे निकामी; एक कोटी नुकसानभरपाई व कलम 307 ची मागणी

सोलापूर | दि. 4 मे 2018 रोजी सोलापुरात मराठा समाज मागासवर्गीय ठरविण्यासाठी न्यायमूर्ती गायकवाड आयोग सोलापुरात दाखल झाले असताना, ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, तो मागासवर्गीय नाही, अशी ठाम भूमिका मांडण्यासाठी आयोगास निवेदन देण्यासाठी शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे उपस्थित होते.

याच वेळी मराठा क्रांतीच्या गुंड प्रवृत्तीच्या जमावाने, पोलिसांच्या देखत, शासकीय विश्रामगृहातच लिंगे यांच्यावर पूर्वनियोजित कटातून जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी झेरॉक्स मशीनमध्ये वापरली जाणारी केमिकलयुक्त शाई थेट डोळे व चेहऱ्यावर फेकली, ज्यामुळे त्यांच्या एका डोळ्याची सुमारे 95% व दुसऱ्या डोळ्याची सुमारे 80% दृष्टी कायमस्वरूपी बाधित झाली. आज ते जवळजवळ अंधत्वाच्या अवस्थेत आहेत.

या प्रकरणी दाखल FIR मध्ये सुरुवातीला IPC 323, 324, 326, 504, 506, 34 ही कलमे लावण्यात आली; मात्र ती अत्यंत अपुरी असून हा खुनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट असल्याचा ठाम आरोप फिर्यादींनी आज न्यायालयात केला. त्यामुळे IPC 307 (खुनाचा प्रयत्न), 120(B), 149, 114, 201 ही गंभीर कलमे वाढविण्याची मागणी करण्यात आली.

सात वर्षांतही तपास प्रभावी न झाल्याचा आरोप करत, CrPC 173(8) अन्वये पुढील तपासाचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. हल्ल्यानंतर आतापर्यंत शस्त्रक्रिया, उपचार, औषधे व प्रवास मिळून सुमारे ₹6,40,000/- खर्च झाला असून, भविष्यात आणखी ₹8 ते 10 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही जबाबात नमूद करण्यात आले.

फिर्यादी जलधारा ऍग्रोप्लास्ट Pvt. Ltd. चे डायरेक्टर असून ITR नुसार वार्षिक उत्पन्न ₹7 लाख आहे. दृष्टीहानी, व्यवसायिक नुकसान, मानसिक त्रास लक्षात घेता एकूण ₹1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई आरोपींकडून वसूल करावी, अशी ठाम मागणी आज न्यायालयात करण्यात आली.

आजच्या सुनावणीस माऊली पवार, रवी मोहिते व सोमनाथ राऊत हे तिन्ही आरोपी हजर होते. सरकारी वकील व आरोपींचे वकील उपस्थित होते. न्यायालयाने आरोपींना प्रत्येक तारखेला हजर राहण्याचे आदेश देत, पुढील काळात नियमित सुनावणी, साक्षीदार व पुरावे तपासले जातील, असे स्पष्ट केले असून ६ फेब्रुवारी २०२६ मध्ये पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. सुनावणीच्या वेळी फिर्यादीच्या सोबत मारुती ढगे बापूसाहेब भंडारे उपस्थित होते

📢 सोशल मीडिया सूचना (जशास तसे प्रसिद्धीसाठी)

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01

हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
बातमी लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका

.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button