जय जोती । समता – एकता विकास ।। जय क्रांती !!! राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

जय जोती ।
समता – एकता विकास ।।
जय क्रांती !!!
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

नोंदणीकृत कार्यालय: ८ बाजीव प्लाझा, एस टी स्टॅन्ड समोर, सोलापूर ४१३००२ (MH-13)
संस्थापक प्रा. आमण देवरे, मुंबई अध्यक्ष प्रा. नारायण काळेल, राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे
निवेदन
मध्यवर्ती टपाल केंद्र
दि.२७/०८/२०२४
प्रति,
माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
मुख्यमंत्री सचिवालय
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई 32
विषय :- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारीला देणेबाबत
निवेदन देणाऱ्याचे नाव: शंकरराव लिंगे
अ.क्र…28/8.1.202.4
आदरणीय महोदय, समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण सर्वोच्च महत्त्वाचे आहे शहर समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पावा आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास म्हणजेच देशाचा विकास या अधनि या क्षेत्रात स्वतःला ओकून देऊन पारदर्शक राहून निस्वार्थपणे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने तथा निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत “राज्य शिक्षक पुरस्काराने” गौरविल्या जाते ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.
आदरणीय महोदय शासन परिपत्रक पीटीनी 2016/प.क्र.98 / टी एन टी 4, दिनांक 21 जुलै, 2016 या शासन निर्णयान्वये राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर योजना “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार” या नावाने राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला त्याबद्दल शासनाचे खूप खूप अभिनंदन.
आदरणीय महोदय या निर्णयाबद्दल आपले अभिनंदन तर आहेच परंतु आपल्याकडून अपेक्षा सुद्धा आहेत. सावित्रीमाई फुले या या भारत देशातील पहिल्या महिला शिक्षिका तथा मुख्याध्यापिका आहेत. त्यांनी व क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांनी या भारत देशात स्त्री शिक्षणाची सुरुवात करून आपलं सबंध आयुष्य स्त्री जिक्षण व समाज उनतीसाठी खर्ची घातलं हे अख्ख्या जगाला माहित आहे. त्यांचे तथा क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले यांचे ऋण आपण कदापिही विसरू शकत नाही. त्यांच्याबद्दलच्या आदराच्या व कृतज्ञतेच्या भावनेतूनच राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराबाबतचे निकष सुधारित करून या पुरस्काराला “कांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार” असे नाव देण्यात आलेले आहे.
आदरणीय महोदय आपणास नम्र विनंती आहे की राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील निकष पात्र प्रज्ञावान शिक्षकांना दिला जाणारा “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार” हा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे सावित्रीमाई फुले यांच्या जन्मदिनी अर्थात 3 जानेवारीला सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, क्रिडा मंत्री, इतर मंत्री तथा उच्चपदस्थ अधिकारी यांच्या हस्ते देण्यात यावा. आपल्याच शासनाच्या परिपत्रकानुसार 3 जानेवारी हा दिवस “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरा केला जातो. जर हा पुरस्कार 03 जानेवारीला दिल्या गेल्यास खऱ्या अर्थाने या महान क्रांतिकारक, बीउद्धारकर्त्या सावित्रीमाईंना खरीखुरी आदरांजली ठरेल.
आदरणीय महोदय या निमित्ताने आपणास पुन्हा एक विनंती सुद्धा आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं प्रामाणिक कर्तव्य पार पाडत असताना
महाराष्ट्र राज्यातील हजारो शिक्षकांना 15-15, 20-20 वर्षांपासून वेतन नाही. काहींना वेतन आहे परंतु ते 20%,40%,60% असे आहे. शिवाय
2005 पूर्वी रुजू झालेले तथा त्यापूर्वी रुजू झालेले व 2005 नंतर अनुदान आलेल्या शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुद्धा नाही ही खेदजनक गोष्ट आहे. समान काम समान मोबदला हे भारतरख डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाचे तत्व असताना हजारो शिक्षकांना कामाचा मोबदला मिळत नाही, शिवाय त्यांना सेवेची हमी नाही आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन नाही ही बाब छत्रपती शिवराय, महात्मा फुले, राजी शाहू महाराज, भारतरख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा तमाम महापुरुषांच्या आणि संत महतांच्या महाराष्ट्र भूमीला न शोभणारी आहे. आपणास विनंती आहे आपली महाराष्ट्र संस्कृती मातृ पितृ आचार्य देवो भवः मानणारी असताना इथे शिक्षकांना सन्मानाची
बागणूक दिल्या जात नाही. त्यांच्या कामाची कदर केल्या जात नाही ही शोकदायक गोष्ट आहे. आपणास विनंती आहे आपण शिक्षकांच्या भावनिक मागणीला उचित प्रतिसाद देत त्यांना न्याय देसाल. सोबतच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार हा 3 जानेवारीला नायगावला देण्याचा निर्णय घेसाल हीच सविनय रास्त अपेक्षा.
माहितीसाठी प्रत : 1. मा.नामदार छगनरावजी भुजबळ साहेब
2. मा. नामदार अतुलजी सावे साहेब.
3. मा. नामदार विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार साहेब
आपला विनीत
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
राष्ट्रीयअध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे
स्वाक्षरी
दिल बंधू न्यूज शिव क्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा



