सोशल

भ्रष्ट लोकांना सन्मानित केले

भ्रष्ट लोकांना सन्मानित केले
माफ करा बसवन्ना*🙏
तुम्ही सांगितलात…
मानव धर्म एकच आहे
मी मात्र धर्मा धर्मा मध्ये भांडण लावत गेलो
तुम्ही सांगितले…
देव हा माणसात असतो
मी मात्र देव दगडात पहात गेलो
तुम्ही सांगितले
झाडें लावा झाडे जगवा
मात्र रोडच्या नावावर सर्व झाडेंच तोडली
तुम्ही सांगितले…
घर हेच मंदिर आहे व आई वडील हेच दैवत आहेत…
मी मात्र घर सोडून वेगळं राहिलो
खरे दैवत सोडून यात्रा करत राहिलो
तुम्ही म्हणालात….
कर्म हिच पूजा आहे. (कायकवे कैलास )
मी मात्र फक्त पूजा व नवस करत राहिलो
तुम्ही म्हणालात…
नोकरीं करण्या पेक्षा नोकरीं देणारे बना….
मी मात्र सर्व तरुणाचे नोकरींच बंद केली….
तुम्ही म्हणालात…
ज्ञान हेच धन आहे…
मी मात्र शाळांच विकून टाकल्या
तुम्ही म्हणालात…
द.या हेच धर्म आहे (अहिंसा प्रमो धर्म)
मी मात्र हिंसा करत गेलो
तुम्ही म्हणालत…
देशाच्या संपतिचे रक्षण करा
मी मात्र संपती विकत गेलो
तुम्ही म्हणालात…
पत्नी ही घरची लक्ष्मी असते
मी मात्र पत्नीलाच सोडून दिले
तुम्ही म्हणालात…
कष्ट करण्यारांचे सन्मान करा
मी मात्र भ्रष्ट लोकांना सन्मानित केले
….. बसवन्ना तुम्ही मला क्षमा करणार ना….. 🙏

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button