सोशल

प्रत्येक माणसाचे अनुभव हे नेहमीच जिवंत असतात म्हणून माणसाने आपआपले अनुभव लिहून साहित्य निर्मिती केली पाहिजे

दौंड-प्रतिनिधी-
प्रत्येक माणसाचे अनुभव हे नेहमीच जिवंत असतात म्हणून माणसाने आपआपले अनुभव लिहून साहित्य निर्मिती केली पाहिजे. त्याकरिता समाजाबरोबर संवाद ठेवणे महत्त्वाचे असते. आत्मचरित्र , कथा, कादंबऱ्या या साहित्यातून माणसं वाचायला मिळतात. माणसाने नकारात्मक नसावे, सतत सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगले पाहिजे . त्यातून साहित्य निर्मिती होऊ शकते असे मत ज्येष्ठ पत्रकार अभिजीत बेल्हेकर यांनी व्यक्त केले.



गोपाळवाडीचे सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब काळे लिखित माझी पासष्टी या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळा लोकसत्ताचे वरिष्ठ सह संपादक अभिजीत बेल्हेकर यांच्या शुभहस्ते दौंड येथे संपन्न झाला. याप्रसंगी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अरुणराव रोडे म्हणाले सामाजिक अनुभव साहित्यातून समाजापुढे आले पाहिजेत. त्यामधून साहित्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे . हे पुस्तक युवक व नागरिकांसाठी निश्चितच प्रेरणादायी राहीलअसे मत श्री रोडे यांनी व्यक्त केले. आप्पासाहेब काळे यांनी आत्मचरित्र लिहिण्यमागचा उद्देश स्पष्ट केला आहे. माझ्या वाट्याला आलेले अनुभव आत्मचरित्रात नमूद केले आहेत. माझा अनुभव, गावचे प्रमुख व ग्रामस्थांच्या सहकार्याने गोपाळवाडी गावचा विकास व प्रगतीचा प्रवास आत्मचरित्रातून समाजापुढे ठेवलेला आहे. याशिवाय 11 प्रकरणातून 45 विषय वाचनीय आहेत.
याप्रसंगी प्राजक्त प्रकाशनचे जालिंदर चांदगुडे, प्रा. डॉ. मधुकर मोकाशी, भाजप नेते वासुदेव काळे , ज्येष्ठ नागरिक संघाचे श्यामजी वाघमारे, देविदास जगदाळे, अशोकराव सुळ, प्रा.अर्जुन जांभुळकर यांनी मनोगते व्यक्त केली .जिल्हा परिषद पुणे माजी सभापती मनिषाताई लव्हे, दौंडचे नगरसेवक जीवराज पवार, मा.नगरसेवक मोहन नारंग, पत्रकार रमेश वत्रे, राजू जगदाळे, मनोहर बोडके यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button