श्री संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा”

2) “श्री संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा”
सालाबादाप्रमाणे संत शिरोमणी श्री. संतसेना महाराज यांची पुण्यतिथी सोहळा श्री संतसेना नाभिक समाजोन्नती संस्था व उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. १०७९ उत्तर कसबा, नाभिक गल्ली, सोलापूर येथे सेना महाराज मंदिरात हा पुण्यतिथी सोहळा दि. २९/०८/२०२४ वार गुरुवार व दि. ३०/०८/२०२४ वार शुक्रवार या दोन दिवशी होणार आहे.
कार्यक्रम दोन दिवस होणार आहे. यामध्ये दि. २९/०८/२०२४ वार गुरुवार रोजी सकाळी ८:०० वाजता श्री संतोष शंकरराव धोत्रे यांच्या अभिषेकाने सोहळ्याची सुरुवात होणार असून सायं ५:०० ते ५:३० महिला भजनी मंडळ सायं. ५:३० ते ६:३० वा. प्रवर्चन, रात्री ८ ते ९ ह.भ.प. गणेश वारे (महाराज) यांचे किर्तन होणार आहे.
दि. ३०/०८/२०२४ रोजी श्रावण द्वादशी वार शुक्रवार रोजी सकाळी ७:०० वाजता श्री मनोहर मामा क्षिरसागर यांचा अभिषेक सकाळी १० ते १२ ह.भ.प. दत्तात्रय महाराज क्षिरसागर (उळे) यांचे गुलालाचे किर्तन दु. १२:०० वाजता त्यांचे हस्ते महाप्रसाद वाटप, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष मनोहर (मामा) क्षिरसागर, अशोक वाळके, मारुती चिकले, रामभाऊ डिगे, पांडुरंग पवार, भारत क्षिरसागर, गणेश वाघमारे, वैजीनाथ शेटे, संतोष धोत्रे, आनंद राऊत यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी उत्सव समितीने १ वर्षाची निवड केली आहे. व उत्सव समिती अध्यक्ष नंदकुमार दळवी त्यांच्या सह सुमित गवळी, गणेश शिंदे, गणेश चौधरी, केदार शिंदे, निखील दळवी, आदि परिश्रम लाभले आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व नाभिक भक्तांनी व समाजबांधवानी गुलालाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष श्री. नंदकुमार दळवी यांनी केले आहे.
तसेच मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी सढळ हाताने सर्व समाज बांधवांनी मदत करावी असे आवहान ट्रस्टी व उत्सव समितीचे अध्यक्ष यांनी केले आहे.
आपला विश्वासू,
(नंदकुमार शिवाजी दळवी) उत्सव समिती अध्यक्ष मो.नं. ९९७०२७३४७७
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




