मंडलनामा क्रमशः 50.पवारांपुढेही नकारघंटा

मंडलनामा क्रमशः
50.पवारांपुढेही नकारघंटा
मुस्लिम ओबीसींच्या जात प्रमाणपत्राबद्दल सतत पाठपुरावा करत असताना आयएएस अधिकाऱ्यांचा असाच एक अनुभव शरद पवार यांच्या उपस्थितीतही आला. माझ्या समजुतीनुसार, जात प्रमाणपत्राबद्दल शासन निर्णय काढण्याचे अधिकार समाजकल्याण विभागाकडे होते. त्यामुळे मुस्लिम ओबीसींना जात प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे प्रयत्न करत होतो. केंद्रीय समाजकल्याण मंत्री बी. एस. रामुवालिया यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करत होतो. मी शरद पवार यांच्याकडे रामुवालिया यांच्यासोबत बैठक घेण्याबाबत मध्यस्थी करण्याची विनंती केली. पवार यांना मुस्लिम ओबीसींबद्दल आस्था होती व त्यावेळी ते आम्हाला सर्वोतोपरी मदत करत होते. त्यांना ओबीसी चळवळीचीही माहिती होती. व्ही. पी. सिंह सरकारने मंडल आयोग स्वीकारला असल्यामुळे मुस्लिमांनाही त्याचा लाभ कधीतरी द्यावाच लागणार होता. त्यामुळे शरद पवारही पुढाकार घेत होते.
पवार यांनी केंद्रीय मंत्री रामुवालिया यांना विनंती करून नवी दिल्लीत बैठक आयोजित केली. या बैठकीला पवार, रामुवालिया यांच्यासह केंद्रीय समाजकल्याण विभागाचे तीन सचिव उपस्थित होते. अर्थातच हे तिघे वरिष्ठ आयएएस अधिकारी. दोन केंद्रीय मंत्री व या तीन अधिकाऱ्यांसमोर मत व अडचणी मांडल्या. यावर काय करता येईल, असे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विचारले. यावेळी या तीनही आयएएस अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका अत्यंत धक्कादायक होती. तिघांचेही म्हणणे होते मुस्लिम धर्मात ओबीसी, एससी, एसटी या प्रवर्गाच्या जाती नाहीत. मी त्यांना समजावून सांगितले. त्यांचा हेका कायम होता. ‘ओबीसीचा मुद्दा थोडावेळ बाजूला ठेवा. पण एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गात सुद्धा मुसलमान नाहीत, असे म्हणणे म्हणजे त्यांची घोर फसवणूक आहे’, असे मी म्हणालो. मी त्या अधिकाऱ्यांकडे दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली.
मुस्लिमांत ‘जाती’ नाहीत, हे मला माहीत आहे. पण मंडल आयोगाच्या निकषानुसार विशिष्ट व्यवसाय करणाऱ्या वर्गांना आरक्षण व सवलत घेता येते, मी तेवढेच मागत आहे, असे अधिकाऱ्यांना म्हणालो. पण ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. या निमित्ताने शरद पवार व रामुवालिया या दोन्ही वरिष्ठ नेत्यांना आयएएस अधिकाऱ्यांच्य ओबीसींबद्दलच्या मानसिकतेचा परिचय झाला.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




