महाविद्यालयीन कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर

1) महाविद्यालयीन कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर
सोलापूर, दि. २५ ऑगस्ट-
राज्य शासनाकडे दिर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी २९ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूरचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्या दिर्घकाळ प्रलंबित आहेत. याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व इतर
घटक संघटनांच्या मार्फत शासनाकडे चर्चा व निवेदने सादर करून, सदर प्रलंबित मागण्यांबाबत सत्वर सकारात्मक निर्णय घ्यावेत यासाठी सततचे प्रयत्न झाले. परंतु या रास्त मागण्यांना आजपर्यंत, वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्याचे दिसून येते. त्यामुळे हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
यावेळी कॉलेज कर्मचारी युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, खजिनदार राहुल कऱ्हाडे, सिनेट सदस्य अजितकुमार संगवे आदी उपस्थित होते
अशा आहेत प्रमुख मागण्या
– सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
– सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा.
– सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करु नका
– सेवानिवृतीचे वय ६० वर्षे करा
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा
(१०/२०/३०) लाभ द्या
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




