ओबीसी आरक्षणास धक्का लागू नये या साठी मोहोळ येथे माळी महासंघाचे तहसीलदार यांना निवेदन

*ओबीसी आरक्षणास धक्का लागू नये या साठी मोहोळ येथे माळी महासंघाचे तहसीलदार यांना निवेदन*
ओबोसी आरक्षण बचाव साठी *राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे* हे वडीगोद्री अंबड येथे तसेच पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर *श्री मंगेश ससाणे , मृणाल ढोले पाटील* यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे . या *उपोषणाला माळी महासंघ यांचा पाठिंबा व्यक्त करत श्री शंकरराव वाघमारे यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणस धक्का लागू नये याची काळजी सरकार ने घ्यावी अशी मागणी निवेदना व्दारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब* याना करणेत आली आहे.
वरील मागणीचे निवेदन नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे याना आज देण्यात आले.
यावेळी माळी महासंघाचे श्री शंकरराव वाघमारे, पाटकुलचे माजी उपसरपंच अनिल वसेकर , सौंदणेचे माजी उपसरपंच संतोष नामदे , उद्योजक बाळासाहेब भानवसे , जि प शाळा सौंदणे चे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम भानवसे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष गोरख भानवसे, पाटकुल चे शंकर नामदे , शंकर जाधव , पेनुर चे आण्णासाहेब सलगर , कुलदीप आहेरकर , मच्छिंद्र गाडे पाटील , विजय चौधरी , अविनाश पांढरे , माळी महासंघाचे अध्यक्ष सुभाष भानवसे, दत्तात्रय पडवळलकर , सूर्यकांत माळी , दीपक गवळी , आनंदा भानवसे, विष्णू भानवसे, तानाजी गोडसे , विष्णू बनसोडे , तानाजी नामदे , पोपट नाना माळी , श्रीराम माळी , धनंजय मोहोळकर यांचे सह अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते .


