6 वर्षीय यशवर्धन करणार *स्वातंत्र्यदिनी आगळ्यावेगळ्या पद्धतीत भारत मातेला वंदन

प्रेस न्यूज
2) *6 वर्षीय यशवर्धन करणार *स्वातंत्र्यदिनी आगळ्यावेगळ्या
पद्धतीत भारत मातेला वंदन
15 ऑगस्ट 2024…78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित साधत.. चिरंजीव यशवर्धन सतीश रेब्बा. हा अवघा 6 वर्षे विद्यार्थी 78 मिनिट ( सव्वा तास) सलग दोन्ही हाताने दोन लाठी फिरवण्याचा विक्रम करणार आहे.. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. यूनिकॉर्न बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. मध्ये केली जाणार आहे.. हा आगळा वेगळा उपक्रम सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशन.. तथा ट्रॅडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन (महाराष्ट्र) व पद्मशाली समाज संचलित नारायणराव कुचन प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमानाने होत आहे.. या उपक्रमात सराव मागील दोन महिन्यापासून सुरू आहे.. यशवर्धन हा लाठी काठी दांडपट्टा शिवकालीन मर्दानी खेळाचा सराव सोलापूर शहर जिल्हा लाठी (स्पोर्ट्स) असोसिएशन चे प्रशिक्षक तथा एशियन निर्णायक पंच. अश्विन कडलासकर.. यांच्याकडे प्रशिक्षण घेतो व लाठी इंडिया ऑर्गनायझेशन चे उपाध्यक्ष शिवराम भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आतापर्यंत राज्यस्तरीय. राष्ट्रीय व एशियन. लाठी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला व यश प्राप्त केले आहे..
15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपक्रमास सकाळी ठीक 10 वाजता बुर्ला महाविद्यालय राजेंद्र चौक सोलापूर या ठिकाणी सुरुवात होईल प्रमुख पाहुणे म्हणून. लाठी इंडिया ऑर्गनायझेशनचे टेक्निकल डायरेक्ट म. रफी शेख यांची प्रमुख उपस्थिती तसेच लाठी इंडिया ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष शिवराम भोसले. सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशनचे जिल्हा सचिव प्रशिक्षक अश्विन
कडलासकर. महिला प्रशिक्षिका व जिल्हा लाठी असोसिएशनच्या खजिनदार सौ. अंजना कडलासकर..
पद्मशाली शिक्षण संस्था चेअध्यक्ष अॅड. श्रीनिवास क्यातम उपाध्यक्ष : प्रा. श्रीनिवास कोंडी सचिव श्री दशरथ गोप सहसचिव : श्री. मल्लिकार्जुन सरगम.. खजिनदार: श्री. गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष श्री. विजयकुमार गुल्लापल्ली.. तसेच नारायणराव कुचन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पुलकेशी संगा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे….
सोलापूर शहर जिल्हा लाठी असोसिएशनचा यावर्षीचा हा सलग 5 वा विश्वविक्रम असणार आहे.. दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारत मातेला वेगवेगळ्या माध्यमातून उपक्रमातून मानवंदना देण्यासाठी सोलापूर लाठी असोसिएशन. असे साहसी उपक्रमाचे आयोजन करते.. युवक युवती लहान मुले यांनी मोबाईलचे विळख्यात न अडकता मर्दानी मैदानी खेळाकडे वळावे.. छत्रपती शिवाजी महाराजांची ही 350 वर्षाची ज्वलंत इतिहास लाभलेले कला जोपासली जावी व नवनवीन खेळाडू घडावे.. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश… यशवर्धन च्या या विश्वकर्मासाठी लाठीचे आंतरराष्ट्रीय महागृह सुभाष मोहिते. लाठी इंडिया ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष अजय आर. शहा. यांनी शुभेच्छा दिल्या तसेच क्रीडा. सामाजिक. शैक्षणिक क्षेत्रातून देखील. यशवर्धनला शुभेच्छा देण्यात
आल्या….
आपला विश्वासू
अश्विन कैडलासकर जिल्हा सचिव मो.नं. ७५५८४५७१७७.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴


