सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 64

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
64
गिरमे हणमंतराव (मृत्यू – १९२६)
हणमंतराव गिरमे थोडेबहुत शिकलेले सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील सत्यशोधक होते. असे असले तरी स्वतंत्र प्रतिभा, धैर्य, दूरदृष्टी आदी मानवी गुणांचा हणमंत गिरमे यांच्यात सुरेख संगम झाल्याने त्यांनी सासवडकर सत्यशोधकांच्या सहकार्याने आपल्या परीने शेती, व्यापार, औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
कोपरगाव, जिल्हा अहमदनगर येथे शेती घेऊन सामुदायिक आधुनिक शेतीचे नमुनेदार उदाहरण प्रस्तुत केले. स्वतंत्र पतपेढी निर्माण करून स्वतंत्र दुकाने उभी केली. अशा या कर्तृत्ववान सत्यशोधकाचे डिसेंबर १९२६ साली अकस्मात निधन झाले.
संदर्भ १. दीनमित्र अंक डिसेंबर १९२६
गिरमे हरिभाऊ बळवंतराव (सुमारे १८९८ – २४ सप्टेंबर १९७१)
सासवडकर सत्यशोधकांनी शेती क्षेत्रात नवीन नवीन प्रयोग करून उद्यमशीलता कमावली. या प्रकल्पात सासवडकर हरिभाऊ गिरमे हे एक अग्रणी नाव होय. सासवडकरांनी कोपरगाव तालुक्यात जमीन घेऊन शेती केली. त्यात हरिभाऊ गिरमेही सहभागी होते. पुढे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे १६०० एकर जमीन घेऊन १९३२ साली ‘माळी शुगर फॅक्टरी’ उभी केली. याचबरोबर येथे एक मॉडेल हायस्कूल उभे केले केले. या नावीन्यपूर्ण प्रकल्पात हरिभाऊ गिरमे यांचेही योगदान महत्त्वाचे राहिले. बेताचे शिक्षण घेतलेले हरिभाऊ
गिरमे या साखर कारखान्याचे १९४० ते १९६५ पर्यंत सतत २५ वर्षे कार्यकारी संचालक राहिले. प्रगतिशील कारखानदार म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला. इ. स. १९४० मध्ये पुणे येथे अखिल भारतीय माळी परिषदेचे २१ वे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान हरिभाऊ गिरमे यांनी भूषविले.
हरिभाऊ गिरमे यांचा जन्म सुमारे १८९८ सालचा असून त्यांचे निधन २४ सप्टेंबर १९७१ साली झाले. संदर्भ – अखिल भारतीय माळी शिक्षण परिषदेचे कार्य-सतीश जामोदकर
गुठाळ विठ्ठल महादेव
विठ्ठल महादेव गुठाळ हे फुले समकालीन सत्यशोधक असून, पुणे येथे त्यांचा आडती व्यवसाय होता. सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूवींच्या बैठकांना गुठाळ नियमित रविवारी उपस्थित राहत असत. २४ सप्टेंबर १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. याप्रसंगी गुठाळ यांनी तळीभंडार उचलून समाजाचे सभासदत्व स्वीकारले. गुठाळ हे प्रसंगी सत्य धर्मोपदेशकाचेही कार्य करीत असत. एक सत्यशोधक वास्तुशांती केल्याने त्यांच्या आडतीतील भागीदारांनी आपली
भागीदारी काढून घेतल्याने काही महिने गुठाळ आर्थिक अडचणीतही आले. अशाप्रसंगी पुणे येथील सत्यशोधक मित्र रामभाऊ म्हस्के यांनी त्यांची पाठराखण केली. अशा बिकट प्रसंगीही गुठाळ सत्यशोधक मतावर ठाम राहिले तसेच सत्यशोधक समाज स्थापन झाल्यावर ग्यानोबा कृष्णाजी सरराणे आणि काशीबाई शिंदे यांचा विवाह ७ मे १८७४ रोजी समाजमते संपन्न झाला, मात्र सनातन्यांनी या विवाहासमोर अनंत अडचणी उभ्या केल्या. अशा प्रसंगी पोलीस बंदोबस्त
ठेवला गेला. बाबाजी राणोजी फुले यांनी २५० माणसे जमा केली. यावेळी महादेव गुठाळ व बाबाजी फुले यांनी परिश्रम घेऊन हे कार्य तडीस नेले.
संदर्भ – महात्मा फुले समग्र वाङ्मय – संपादक – य. दि. फडके
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




