सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 63

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
63
देहयष्टी असलेले भगवानराव अटीतटीच्या प्रसंगी दोन हात करायला मागेपुढे पाहत नसत.
एका प्रसंगी काही दलित मंडळी कारी येथून मळेगावला बैलगाड्या घेऊन जात असताना त्यांनी तेथील गावतळ्यावर बैलांना पाणी पाजले. झाले. पाणी विटाळले म्हणून गावच्या देशपांडे यांनी दलित मंडळींना बसवून ठेवले. ही
हकीकत कारीत भगवानराव गायकवाड यांना समजताच त्यांनी मळेगावला अनेक तरुणांना घेऊन जाऊन दोन हात करून अस्पृश्य मंडळींची सुटका केली. दुसऱ्या एका प्रसंगी कारीचा जलसा मळेगावला गेला असता मळेगावच्या देशपांडे यांनी काही मराठा मंडळींना बरोबर घेऊन त्या दिवशी जलसा होऊ दिला नाही. जलशावाल्यांनी जलसा करू देण्यासाठी विनंती केली. मात्र, ही विनंती व्यर्थ वाया गेली.
या जलशासमवेत असलेल्या भगवानरावांनी याप्रसंगी जाहीर प्रतिज्ञा केली की, उद्या रात्री मळेगावात जलसा करूनच दाखवतो. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मळेगावला जलसा झाला. दुसऱ्या दिवशी विरोधक जलशाकडे फिरकलेच नाहीत. दरम्यान, जलसा खेळात विघ्न येऊ नये म्हणून भगवानराव गायकवाडांनी मुद्दाम कारीवरून दोनशे तरुणांना बोलावून घेतले होते.
संदर्भ सत्यशोधक ज्ञानेश्वर वावरे, उस्मानाबाद यांचे टिपण
गावले पुंजा महादू पाटील
(जन्म सुमारे १८७४-मृत्यू १९४४)
पुंजा महादू पाटील गावले हे मौजे सोनगाव (फकीरवाडी), तालुका निफाड, जिल्हा नाशिक येचील सत्यशोधक असून त्यांचा जन्म सुमारे १८७४ साली झाला. पुंजा पाटील गावले हे पिंपळगाव बसवंत येथील ज्येष्ठ सत्यशोधक गणपतराव दादा मोरे यांचे परमस्नेही होते. त्यांनी गणपतराव दादा मोरे यांच्या सहकायनि सोनगाव परिसरात सत्यशोधकी कार्य केले. ‘श्री उदोजी मराठा बोर्डिंग, नाशिक’ला आपल्यापरीने सहकार्य केले. इतकेच नव्हे तर सत्यशोधक चळवळीतील
कार्यकत्यांनाही प्रसंगी आर्थिक सहकार्य केले. दरम्यान, इ. स. १९३६ साली त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज देऊन त्यांच्या ‘फकीरवाडी’ गावाचे नामांतर सोनगाव असे करून घेतले. दरम्यान, त्यांच्या गावात भाऊबंदकीवरून बरेच वैमनस्याचे वातावरण फैलावले होते. अशाप्रसंगी सत्यशोधकी व्याख्याने गावात आयोजित करून पुंजा पाटलांनी सोनगावात शांतता प्रस्थापित केली. अशा या सत्यशोधकाचे इ. स. १९४४ साली निधन झाले.
गिरमे
बळवंतराव धर्माजी
(३० जून १८६८- २२ जाने. १९३७)
प्रबोधनपर कार्याचा गाजावाजा न करता आपले सत्यशोधकी कार्य अत्यंत संयमाने पूर्ण करीत राहणारे एक सत्यशोधक बळवंतराव धर्माजी गिरमे हे एक होत. मौजे सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे त्यांचे वास्तव्य होते. सासवडकर मंडळींनी केलेल्या शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगाला गिरमे यांचे सहकार्य राहिले. गिरमे हे महसूल खात्यात नोकरीस होते. मुक्काम तरवडी, तालुका नेवासे, जिल्हा अहमदनगर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘दीनमित्र’ पत्राचे ते आरंभापासून वर्गणीदार, वाचक होते. सन १८६८ साली जन्मलेले गिरमे हे महात्मा फुले कालखंडानंतरचे एक संयमी सत्यशोधक होते.
त्यांच्या ६७ व्या जन्मदिनी विशेष कार्यक्रम दिनांक ३० जून १९३५ रोजी सासवड येथे ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. त्यानंतर वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे दिनांक २२ जानेवारी १९३७ रोजी सासवड येथे निधन झाले. दरम्यान, सन १९१० मध्ये सासवडकर सत्यशोधक नारायणराव मारुतीराव नवले यांचे ‘धर्मभोळेपणाची तुंबडी’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे प्रारंभिक वाचन बळवंतरावांनी केले.
संदर्भ – १. दीनमित्र – अंक – दि ३-०२-१९३७, २. सत्यशोधकी साहित्याचा इतिहास – (खंड पहिला)- प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




