सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमश: 61

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमश:
61
‘अस्पृश्यता’ समाजातून नष्ट झाली पाहिजे, हा मुख्य स्वर या परिषदेतून घुमला. तशा आशयाचे एक निवेदन तयार करण्यात आले. या निवेदनावर उपस्थित असलेल्या प्रमुख कार्यकत्यांनी सह्या केल्या. मात्र, लोकमान्य असलेले बळवंतराव गंगाधर टिळक यांनी या निवेदनावर महषींच्या खांद्यावर हात ठेवून सही करण्यास असमर्थता दर्शविली!
सयाजीराव महाराजांचे सत्यशोधक चळवळीकडे अंतः चधूतून लक्ष असल्याने त्यांनी ‘सोमवंशीय मित्र ‘पत्राचे कर्ते पुणेकर शिवराम जानबा कांबळे यांना बडोदा येथे बोलावून त्यांचा यथोयाग्य सत्कार केला होता. तसेच महात्मा फुले यांचे सहकारी सेवानिवृत्त फौजदार देवराव ठोसर यांना बडोद्यास मुद्दाम बोलावून ‘मानपत्र’ देऊन त्यांचा २७ सप्टेंबर १८८५ रोजी गौरव केला होता. पुढे सत्यशोधक समाजाचे दुसऱ्या फळीतील नेते सत्यशोधक वासुदेवराव लिंगोजी बिर्जे यांमा १८९४ ते १९०५ सालापर्यंत स्टेट लायब्ररियन म्हणून महाराजांनी नियुक्त केले. दरम्यान, या अकरा वर्षाच्या कालावधीत बिर्जे यांनी ‘क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व’ हा सत्यशोधकी विचारपठडीतील अनमोल ग्रंथ बडोदे येथे सिद्ध केला. ‘लक्ष्मीविलास’ राजवाड्यात सातत्याने सत्यशोधकांची वर्दळ असे. ‘लक्ष्मी विलास’ राजवाड्धाने महाराज आणि सत्यशोधकांच्या अंतरीचे बोल ऐकले आहेत. दिनांक १७-२-१९३० रोजी महाराजांनी सत्यशोधक कार्यकर्त्यांची एक बैठक राजवाड्यात मुद्दाम आयोजित केली होती. सत्यशोधक समाजाचे महान प्रचारक ओतूरकर शास्त्री, नारो बाबा महाधट, पानसरे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. पानसरे यांच्या व्याख्यानानंतर महाराजांनी सत्यशोधकांना गार्गदर्शन केले. तसेच शास्त्री महाधटांना मराठी मुलखात फिरस्ती करण्यासाठी दोनशे रुपये बिदागीही दिली.
अन्य एक सत्यशोधक धोंडिबा नामदेव कुंभार यांनी सत्यशोधक पठडीतील ‘वेदाचार’ नावाचा ग्रंथ इ. स. १८९७ मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथाच्या शेवटच्या पृष्ठावर सत्यशोधक सयाजीराव महाराजांचा आदराने फोटो घातला आहे. तसेच आद्य सत्यशोधक जलसाकार भीमराव महामुनी यांची महाराजांकडे चांगली ऊठबैस होती. भीमराव महामुनी यांचा ‘विद्याप्रकाश’ नामक जलसा काव्यसंग्रह असून प्रसंगी काव्यात त्यांनी महाराजांच्या कार्याची नोंद घेतली आहे; तसेच ‘श्री. सयाजीराव महाराजांचा’ अडीच पानी पोवाडा लिहून महाराजांच्या सत्यशोधकी कार्यावर झगझगीत प्रकाश टाकला आहे. आणखी एक सत्त्यशोधक लेखक
पंढरीनाथ सीताराम पाटील यांनीही इ. स. १९३८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या महात्मा फुले ग्रंथात खासकरून एक प्रकरण प्रसिद्ध करून महाराजांच्या सत्यशोधकी कार्याची नोंद घेतली आहे.
सर्वहारा वर्गाच्या हितासाठी सत्यशोधको भूमिकेतून सतत साठ वर्षे राज्य करणाऱ्या महाराजांचे ६ फेब्रुवारी १९३९ रोजी मुंबई येथे निधन झाले. संदर्भ लोकपाल राजा सयाजीराव बाबा भांड
गायकवाड
आनंदराव यशवंत
आनंदराव यशवंत गायकवाड हे उच्चशिक्षित सत्यशोधक असून, ते मौजे आसनगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा येथील सत्यशोधक आहेत. ते पेशाने शिक्षक असल्याने त्यांच्या अनेक विद्याव्यांना त्यांनी सत्यशोधक चळवळीत सक्रिय केले. ते सातारा जिल्हा सत्यशोधक शाखेचे अध्यक्ष आहेत.
गायकवाड
राम गणपतराव
(जन्म ७ सप्टेंबर १९४९)
राम गणपतराव गायकवाड हे उच्चविद्याविभूषित सत्यशोधक असून, त्यांचा जन्म ७ सप्टेंबर १९४९ रोजी मौजे देवळाली, तालुका-जिल्हा उस्मानाबाद येथे झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी डॉ. बाबासाहेब अआंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले (एम. ए. (समाजशास्त्र), एम. एस. डब्ल्यू.), पुढे ते जालना येथे शासकीय सेवेत होते. तेथेच ते सेवानिवृत्त झाले. अन्यायाची चीड
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




