सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमश: 67

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमश:
67
गोटे पुंजाजी रामजी
सत्यशोधक गोटे पुंजाजी रामजी हे मौजे केंदळी, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ येथील सत्यशोधक असून त्यांच्या नावावर ‘सत्यसुबोध नाटक’ (१९२२) आणि ‘ब्राह्मणेतर विरुद्ध धूर्त ब्राह्मण’ (१९२६) या दोन सत्यशोधकी नाटकांची नोद आहे. गोटे यांच्या नावावर दोन नाट्यसंहितांची नोंद असली तरी इ. स. १९३३ साली नागपूरकर सत्यशोधक बाबूराव तात्याजी भोसले संपादित विदर्भ सत्यशोधक ज्युबिली ग्रंथात यवतमाळ जिल्ह्यातील सत्यशोधक ग्रंथ लेखकांच्या मथळ्यात त्यांचा नामोल्लेख आढळून येत नाही.
गोडे व्यंकटराव राघोबा
सत्यशोधक व्यंकटराव गोडे हे वर्धा शहराजवळील, मौजे खरंगाना गावचे सत्यशोधक असून, त्यांचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग राहिला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयोजिलेल्या ‘अस्पृश्यता निर्मूलन परिषदेत’ मुंबई मुक्कामी सहभागी होऊन अस्पृश्यता निर्मूलनाचा ठरावही त्यांनी मांडला. इ.स. १९२४ सालापर्यंत अ. भा. मराठा शिक्षण परिषद आणि ब्राह्मणेतर चळवळीत ते सक्रिय राहिले. वर्धा शहरात त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने ‘मराठा बोर्डिंग’ची स्थापना केली. पुढे ‘मराठा बोर्डिंग’चे ‘मॉडेल हायस्कूल’मध्ये रूपांतर करण्यात आले. १९२५-२६ सालात सत्यशोधक परिषदांमध्ये त्यांचा उत्तम सहभाग राहिला. २४ जुलै १९२६ रोजी वर्धा येवून त्यांनी ‘ब्राह्मणेतर’ सत्यशोधक पत्र सुरू केले. हे पत्र तीन वर्षे चालून १९२८ सालात बंद पडले. या पत्राचे अंक डॉ. बाबासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील शाहू संशोधन केंद्रात जतन करण्यात आले आहेत. (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
दरम्यान १९२८ साली खरंगाना येथील स्वतःच्या घरातील विहीर अस्पृश्यांसाठी मोठ्या आनंदाने त्यांनी खुली केली. इतकेच नव्हे तर घरकामासाठी अस्पृश्य व्यक्तीही त्यांच्याकडे असत. त्यांनी शेतीवरही अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग केले. विहिरीतून पाणी काढण्याच्या यंत्राचाही प्रयोग त्यांनी करून पाहिला.
इ. स. १९६३ साली गोडे यांच्या सामाजिक कार्यातून उतराई व्हावे म्हणून त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्यशोधक वामनराव घोरपडे यांनी ‘व्यंकटराव गोडे ऊर्फ आण्याजी गोडे यांचे संक्षिप्त जीवनचरित्र’ शीर्षकाचे चरित्र प्रसिद्ध केले. दरम्यान, ब्राह्मणेतर पत्र प्रसिद्ध होत असताना गोडे यांनी ‘धर्मगुंड व अस्पृश्य’ या अनुषंगाने एक झणझणीत लेख या पत्रात प्रसिद्ध केला होता. या अनुषंगाने त्यांच्यावर खटला उभा ना राहिला होता. पुढे ते या खटल्यातून निर्दोष सुटले. संदर्भ – विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य-डॉ. अशोक चोपडे
गोपाळे दाजीसाहेब तुकाराम यादवराव पाटील
सत्यशोधक उपदेशक ‘क्षत्रिय मराठे शास्त्री नारो बाबाजी महाघट पानसरे पाटील’ ओतूरकर यांच्यासम आणखी एक पल्लेदार नामोल्लेख सत्यशोधक दस्तावेजात आढळून येतो. हा उल्लेख महात्मा फुले, भाऊ पाटील ओतूरकर समकालीन सत्यशोधक दाजीसाहेब तुकाराम यादवराव पाटील गोपाळे यांचा. दाजीसाहेब गोपाळे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील चिखली हे असून नोकरी, व्यवसायानिमित्त त्यांचे वास्तव्य पुणे येथे राहिले. ते पुणे येथे उच्चाधिकारीपदावर कार्यरत होते. पुणे येथे वास्तव्यास असताना दाजीसाहेब सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते बनले. पुढे उपदेशक झाले. प्रचारक, उपदेशकाचे कार्य करताना ते सत्यशोधक मताचे लेखन आणि काव्यसृजनही करीत.
पुणे सत्यशोधक शाखेचे उपदेशक दाजीसाहेब गोपाळे यांच्या जीवनकार्याच्या अनुषंगाने सत्यशोधक दस्तावेजात फारशी ठोस माहिती उपलब्ध होत नाही. प्रस्तुत बाब सत्य असली तरी म. फुले चरित्रकार पं. सी. पाटील, प्रथम सत्यशोधकी अधिवेशनाचे अध्यक्ष स्वामी अय्यावारू, पुणे येथील म. फुले चरित्रकार अनंतराव एकनाथराव गवंडी (पालकर), हडपसर येथील सत्यशोधक,
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




